

Three arrested in case of firing on youth, two escape
नगर पुढारी वृत्तसेवा
ऋषी डवम याच्यासोबत का राहतो, असे म्हणून लाथाबुक्यांनी मारहाण करत चौघांनी पिस्तुलातून गोळीबार करून एकाला जीचे मारण्याचा प्रयत्न केला, नगर शहरात सोमवारी (दि. २) मध्यरात्रीच्या सुमारास तपोवन रोडवर घडलेल्या या धरारक घटनेनंतर तोफखाना पोलिसांनी दोन अटक, दोघे तासांत तिघांना ताब्यात घेतले. आणखी दोन जणांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी सांगितले, की प्रमोद रामदास घोडके (वय २४) हा दर्गादायरा, ढळणवस्ती परिसरात राहतो. पोडके मित्र ओफारसमवेत (पूर्ण नाव समजले नाही) तपीचन रोडवरील इंडो आयरिश हॉस्पिटलजवळील मेडिकल स्टोअरमध्ये गोळी आणण्यासाठो जात होता. त्याला मयूर फणसे याने अडवले. 'तू ऋषी उवणसोबत का राहतो,' असे विचारले. या वेळी त्यांच्यात बाद झाला, मयूरने त्याच्या साथीदारांना बोलावून घेतले.
आकाश नसाने (वय २५), कुणाल मराठे (वय ३०), राहुल सांगळे (वय ३५), भीमराव उगव्हाड (वय अंदाजे ५५) हे घटनास्थली आले. मयूर, आकाश, कुणाल यांनी प्रमोद यांना लाथाबुक्याने मारहाण केली. भीमरार आव्हाड याने पिस्तुलातून प्रमोद व त्याच्या मित्राच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या.
या प्रकरणी प्रमोद घोडके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला, तोफखान्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली, त्या वेळी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मयूर, आकाश, कुणाल यांना जेरबंद केले. गोळीबार करणारा भीमराव आव्हाड आणि राहुल सांगळे पसार झाले.
आरोपी आव्हाड हा पांगरमल दारू प्रकरणातील आरोपी असून, तो जामिनावर बाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक उग्ज्यलसिंग राजपूत तपास करीत आहेत.