

Ahilyanagar Tanpure Sugar Factory Election Explained In Marathi
रियाज देशमुख :
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्यावर विश्वास व्यक्त करत बंद स्थितीतील डॉ. वा. वा. तनपुरे कारखान्यांची सत्ता सभासदांनी एकहाती सोपविली. विधानसभा निवडणुकीत बॅकफुटवर गेलेल्या तनपुरे कुटुंबाचा आत्मविश्वास या निकालाने वाढला, मात्र त्याचसोबत कारखाना सुरू करण्याची कसरतही तनपुरेंना करावी लागणार आहे. कारखाना सुरू करताना चुलत्या-पुतण्याचा कस लागणार असला तरी त्यातूनच दोघांनाही भविष्यातील 'ऊर्जा' मिळणार असल्याचे संकेत आहेत.
विधानसभेच्या पराभवानंतर तनपुरे कुटुंबियांचा आत्मविश्वास डळमळीत झाला होता. विरोधकाचे पानीपत करताना सर्वच्या सर्व २९ जागा जिंकल्यानंतर सहाजिकच तनपुरे यांचा उत्साह दुगावला आहे. राजकीय ओढाताणीत राहुरीकरांचा हकाचा साखर कारखाना पोरका झाला. सभासदांनीही कारखान्यातील सलेच्या सारीपटावरील सोंगऊया कायम फिरत्या ठेवल्या. बदलाच्या प्रयोगात सत्ताधाऱ्यांना नेहमीच ऊस पळवापळबोचा सामना करावा लागला. त्याचा गाळपावर परिणाम झाल्याने कारखान्याला आर्थिक घरघर लागली, हे वास्तव, सारखर कारखान्यामुळेच राहुरी तालुक्याची भरभराट झाली.
कारखान्याशी संलग्र संस्थांमुळे दळण वळणाचे प्रश्न मार्गी लागलेच पण शिक्षणाची गंगोत्रीही खेड्यापाड्यात पोहचली. विकासाच्या वाटेवर धावणाऱ्या राहुरीला दृष्ट लागली अन् राजकीय कुरपोट्यात 'दादांची' सहकाराची गढ़ी ढासळली. मुळा सुतगिरणी, पिपल्स बैंक सारख्या सहकारी संस्था अवसायनात निघाल्या. पुढे डॉ. तनपुरे कारखान्याला लागलेली ओहोटी बावतच गेली पाणी आडवा, पाणी जिरवा असे नारे देताना सुजलम सुफलम राहुरीतील राजकीय नेते 'आडवा आडवी, जिरावाजिरवी'च्या राजकारणात मग झाली. शेजाग्यांची मदत घेत राजकीय जिरवाजिरवीला जोम आला.
कारखान्यातील सत्तेला विरोध असणा-यांनी इतर कारखान्याला कस देत कारखाना संकटात आणण्याचा प्रयत्न कसोशीने केले. त्यातून कारखान्याचे आर्थिक गणित चुकले. कारखान्याच्या सर्व नकारात्मकतेचे सगळे खापर फुटले ते तनपुरे कुटुंबियांवरच, त्याची झळ ज्येष्ठ नेते प्रसाद तनपुरे यांना सर्वात प्रथम बसली. सलग २५ वर्षे विधीमंडळात असलेले प्रसाद तनपुरे यांचा २००४ मध्ये पराभव करण्यासाठी विरोधकांनी कारखान्याचा मुद्दा प्रभावीपणे मांडला होता. पुढची १५ वर्षे तनपुरे कुटुंबियांना सत्तेला मुकावे लागले त्यामागे कारखाना हाच मुद्दा कळीचा ठरला होता. ती नकारात्मकता २०१९ मध्ये सकारात्मकर्तत बदलली. प्राजक्त तनपुरे यांना विधीमंडळात संधी मिळाली. मात्र २०२४ च्या विधानसभेला पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला. कोट्यवधींची विकास कामे व मंत्रीपदाच्या कार्यकाळात जनहिताची कामे करूनही पराभव झाल्याचे शल्य तनपुरेंसह समर्थकांनाही होते. अशा 'निगेटिवा सिच्युएशन' मध्ये डॉ. तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली. सुख्वातीला कारखाना निवडणूक लढविण्याबाचत तनपुरे चुलते पुतणे फारसे उत्सूक नकाते. मात्र निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात कार्यकत्यांनी आग्रह धरला, कार्यकत्यांचा शब्द चुलते-पुतणे डावलू शकले नाही, सत्तेची तमा न बाळगता राहुरीच्या अस्मितेसाठी उमेदवारांची जुळवाजुळव करत कारखाना निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली.
दुसरीकडे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. शिवाजी कर्डिले यांनीही भाजप-मित्रपक्षांना सोवत घेत इलेक्शन लहण्याचा निर्णय घेतला, परंतु 'शेजाऱ्याच्या आदेशानंतर लागलीच रिव्हर्सडी टाकला. लोकसभेला मविआचे उमेदवार नीलेश लके तर विधानसभेला शिवाजी कर्डिलेंना पाठयाळ देणारे राजू शेटे यांचाही हात सोडत भाजपने अलिप्त भूमिका बजावली. त्यामुळे 'शेजाया'च्या भरवशावर असलेले शेटे एकाकी पडले, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना पाठिशी असल्याचा संदेश देत शेटे यांनी तनपुरे विरोधाची धार तेजोमय केली. इकडे माजी मंत्री प्राजक्त बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी प्रचाराची सुत्रे हाती घेत रणनिती आखली. कारखाना बचाव कृती समितीनेही तनपुरेंना विरोध करताना सभासदांना साद घातली. निवडणूक प्रचारादरम्यान वैयक्तिक टिकाटिपण्णी टाळत चुलत्या पुतण्यांनी गटनिहाय बैठकांचा चयका लावताना सभासदांसमोर कारखान्याचे हित मांडत व्हिजन ठेवले. ठनपुरेंचे व्हिजन सभासदांना भावले अन् सभासदांनी कारखाना सत्तेच्या वाण्या एकतर्फी ताब्यात देताना विरोधकांचे पानीपत केले.
लोकसभा निवडणुकीत बिरोधकांना मदत करणाऱ्यांना डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत 'जागा दाखवून देत बचपा काढला. 'त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही' हे डॉ. सुजय विखे यांचे मक्तस्य कारखाना निवडणूक निकालानंतर आजही अनेकांना आठवले. लोकसभेला विखे विरोधी भूमिका बजावणाऱ्या राजू शेटे यांचा 'करेक्ट कार्यक्रम' म्हणजे लोकसभेचा बदलाच, अशी धूम सोशल मिडियावर उतली. तनपुरेंच्या विजयात सहभाग ही दूसरी बाजूही अनेकांच्या सुपीक डोक्यात शिरली ती वेगळीच!
डॉ. तनपुरे कारखान्याच्या अपयशाचे खापर राहुरीकरांनी त्यावेळच्या 'जनसेवा व्याणि विकास मंडळा'वर फोडत रोष व्यक्त करताना तनपुरेच्या पराभव घडवून आणला. मात्र वीस वर्षानंतर सभासदांनी पुन्हा तनपुरे यांच्यावरच विश्वास व्यक्त करताना एकहाती सत्ता दिली. गतकाळात तनपुरे कुटुंबियांसाठी कारखाना शाप ठरला त्याच कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यास तनपुरे सक्सेस ठरले तर राहुरीकरांच्या विश्वासाला पात्र ठरतील, अन् तोच कारखाना भविष्यातील निवडणुकांसाठी प्राजक्त तनपुरे यांना वरदान ठरल्यास आश्वर्य वाटयाला नको.