Rahuri News
Tanpure Sugar FactoryPudhari

Tanpure Sugar Factory: ‘डॉ तनपुरे’ कारखान्यात सत्तांतर; ‘जनसेवे’ची एकहाती सत्ता, विरोधकांचा धुव्वा

विरोधकांचा सुपडासाफ करत सर्वच्या सर्व 21 जागांवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्याकडे जनसेवा मंडळाने एकहाती सत्ता मिळविली.
Published on

राहुरी: बंद असला तरी राहुरी तालुक्याची कामधेनू समजला जाणारा डॉ. बाबूराव दादा तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत सत्तांतर झाले. विरोधकांचा सुपडासाफ करत सर्वच्या सर्व 21 जागांवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्याकडे जनसेवा मंडळाने एकहाती सत्ता मिळविली. सत्ताधारी जनसेवा मंडळाला कारखाना सुरू करण्याचे शिवधनुष्य पेलण्याची संधी सभासदांनी दिली.

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या मार्गदर्शनात जनसेवा मंडळ, संभाजी प्रतिष्ठाणचे राजू शेटे यांचे शेतकरी विकास मंडळ, अमृत धुमाळ, अजित कदम व अरुण कडू यांच्या मार्गदर्शनात लढलेल्या कारखाना बचाव कृती समिती अशी तिरंगी लढत झाली. (Latest Ahilyanagar News)

Rahuri News
Leopard Escape: बिबट्या हुश्शार.. पिंजर्‍यातून पसार..!

21 जागेसाठी 56 उमेदवारांनी नशीब अजमावले. शनिवारी मतदान झाल्यानंतर रविवारी सकाळीच स्व. रामदास धुमाळ महाविद्यालयात मतमोजणीस प्रारंभ झाला. मतमोजणीच्या सुरूवातीपासूनच जनसेवा मंडळाने आघाडी घेतली. सेवा संस्था प्रतिनिधींच्या ब वर्ग प्रवर्गातून सभापती अरुण तनपुरे यांचे चिरंजीव हर्ष तनपुरे यांनी विजयाचा झेंडा फडकावत ‘जनसेवे’चे खाते उघडले.

त्यानंतर कोल्हार गटातून जनसेवा मंडळाचे तिन्ही उमेदवार दोन हजार पेक्षा अधिक मताने विजयी झाले. पाठोपाठ देवळाली प्रवरा, टाकळीमिया, आरडगाव, वांबोरी, राहुरी गटाची मतमोजणी झाली. त्यातही 2 हजारापेक्षा अधिक मतांची आघाडी घेत जनसेवा मंडळाच्या उमेदवारांनी विजयी गुलाल उधळला.

कारखाना निवडणुकीत 16 उमेदवार विजयी झाल्याचे समजताच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व सभापती अरुण तनपुरे यांनी कार्यकर्त्यांसह गुलाल उधळण करीत जल्लोष केला. अनुसूचित जाती व जमाती, महिला प्रवर्गातही तनपुरेंच्या जनसेवा गटानेच बाजी मारली.

यासह इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग गटातही तनपुरेंच्याच उमेदवारांनी एकहाती विजय मिळविला. सर्वसाधारण मागास प्रवर्गात रावसाहेब चाचा तनपुरे यांनी विजय मिळवला. तनपुरेंच्या जनसेवा मंडळाची लढत शेटे यांच्या शेतकरी विकास मंडळासोबत झाली. तर कारखाना बचाव कृती समितीच्या उमेदवारांना तिसर्‍या क्रमाकाची मते मिळाली. तनपुरे यांच्या जनसेवा मंडळाच्या सर्वच उमेदवार दोन/अडीच हजाराच्या फरकाने विजयी झाले.

Rahuri News
Ahilyanagar News: अल्पवयीन मुलीस गर्भवती केल्याप्रकरणी सक्तमजुरी

कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचा डोंगर तनपुरे कारखान्यावर आहे. त्यामुळे तनपुरेंना कारखाना सुरू करण्याचे मोठे आव्हान आहे. अनेक संकटे तसेच कर्जाच्या खाईत लोटलेल्या तनपुरे कारखान्याला उर्जा देण्यासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व सभापती अरुण तनपुरे यांना प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news