Sugarcane Price Protest: ऊसदराचा तिढा कायम; बेलापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अडवले १५ उसाचे ट्रॅक्टर

प्रशासनाचे ऊसतोड बंदीचे आदेश धाब्यावर; अशोक, प्रवरा आणि संजीवनी कारखान्यांच्या वाहतुकीवर आंदोलकांची कारवाई
Sugarcane Price Protest
Sugarcane Price ProtestPudhari
Published on: 
Updated on: 

श्रीरामपूर: ऊस दराच्या प्रश्नावर तोडगा निघेपर्यंत जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊसतोड बंद ठेवावी, असे स्पष्ट आदेश जिल्हा प्रशासनाने दिले असतानाही कारखान्यांकडून उसाची वाहतूक सुरूच असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाचे आदेश डावलणाऱ्या कारखान्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज बेलापूर येथील कोल्हार चौकात अशोक, प्रवरा आणि संजीवनी साखर कारखान्यांचे सुमारे १५ उसाचे ट्रॅक्टर अडवले.

Sugarcane Price Protest
Patelwada Lake Water Issue: पाथर्डीत पाझर तलावातील पाण्याची चोरी? अवघा २५ टक्के साठा शिल्लक; कारवाईचे आदेश कागदावरच!

माजी खा. राजू शेट्टी, खा. निलेश लंके व शेतकरी संघटनांच्या मोर्चानंतर अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने २३ नोव्हेंबरला लेखी आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, मंगळवारी (दि.२४) सकाळी १० वाजेपर्यंत आधी तोडलेला ऊस गाळून पूर्ण करावा आणि त्यानंतर २६ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊसतोड पूर्णतः स्थगित ठेवावी, असे निर्देश दिले आहेत. असे असतानाही काल सकाळी १० वाजेनंतर महामार्गावरून उसाची वाहतूक सुरू होती.

Sugarcane Price Protest
Ahilyanagar Shiv Sena: शिवसेनेच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हाप्रमुख पदासाठी १२ जणांची दावेदारी; शिर्डीत जोरदार लॉबिंग

ही बाब लक्षात येताच ‘स्वाभिमानी’चे जितेंद्र भोसले, गोविंद वाबळे, संदीप गवारे, निलेश बनकर, शंकरराव कोळसे, संजय वारुळे, प्रकाश थोरात, दीपक वाबळे, बाळासाहेब थोरात आदी पदाधिकाऱ्यांनी कोल्हार चौकात धाव घेत, या १५ ट्रॅक्टरचा ताफा रोखून धरला. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रत्येक ट्रॅक्टरची व ऊस तोडणीच्या वेळेची पडताळणी केली. यामध्ये अशोक कारखान्याचे ट्रॅक्टर प्रशासनाने दिलेल्या सकाळी १० च्या मुदतीच्या आत तोडलेला ऊस घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले.

Sugarcane Price Protest
Ahilyanagar Water Supply: नगरकरांनो, पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदलले; शहरातील अनेक भागांना उशिराने पाणी

त्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेत अशोक कारखान्याचे ट्रॅक्टर पुढील गाळपासाठी कारखान्याकडे रवाना केले. मात्र, प्रवरा आणि संजीवनी या कारखान्यांचे ट्रॅक्टर मुदत संपल्यानंतरही वाहतूक करत असल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत त्यांना रोखले व पुन्हा ऊस तोडणीच्या फडावर परत पाठवून दिले.

Sugarcane Price Protest
Nilwande Dam Water Supply: निळवंडे धरणाचे पाणी आणखी तीन गावांना मिळणार; आमदार आशुतोष काळेंच्या सूचनेनंतर उपाययोजनांना वेग

ऊसाला प्रतिटन चार हजार रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी आज गुरुवारी (दि.२६) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व साखर कारखान्यांच्या चेअरमन यांना या बैठकीस उपस्थित राहणे बंधनकारक केले असून, प्रतिनिधी किंवा व्यवस्थापकीय संचालकांना पाठवू नये, असे सक्त निर्देश प्रशासनाने दिले आहेत. या बैठकीत निर्णय होईपर्यंत कारखान्यांनी ऊसतोड बंद ठेवावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.