Jamkhed Milk Powder Dump: जामखेडमध्ये वनहद्दीत संशयास्पद दुग्धजन्य पावडरच्या ५०-६० गोण्या; चौकशीची मागणी

दिघोळ-तेलंगशी रस्त्यालगत अज्ञातांकडून साठा टाकल्याची घटना; अन्न व औषध प्रशासन, वन विभाग आणि पोलिस तपासाच्या तयारीत
Jamkhed Milk Powder Dump
Jamkhed Milk Powder DumpPudhari
Published on
Updated on

जामखेड: तालुक्यातील दिघोळ-तेलंगशी रस्त्यालगत वन विभागाच्या हद्दीत अज्ञात व्यक्तींनी दुग्धजन्य पावडरसदृश पदार्थाच्या सुमारे ५० ते ६० गोण्या टाकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jamkhed Milk Powder Dump
Ahilyanagar Rain Deficit: अहिल्यानगरात ५२ टक्के पावसाची तूट; पावणेसहा लाख हेक्टरवरील खरीप पेरणी रखडली

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा साठा गुरूवारी किंवा शुक्रवारी रात्रीच्या सुमारास येथे टाकण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Jamkhed Milk Powder Dump
Maharashtra TET Exam Postponed: पेपरफुटीच्या संशयामुळे टीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर; अहिल्यानगरातील ३१,६५५ परीक्षार्थ्यांचा हिरमोड

राज्यात सध्या अन्न भेसळीविरोधात कठोर मोहीम सुरू आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवाईच्या भीतीने हा दुग्धजन्य साठा येथे आणून टाकला असावा, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, या दाव्याला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नसून तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Jamkhed Milk Powder Dump
Campus to Career: ‘पुढारी कॅम्पस टू करिअर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; एआय, रोबोटिक्स आणि करिअर संधींबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

दरम्यान, या गोण्यांमधील पदार्थ नेमका कोणता आहे, तो निकृष्ट, भेसळयुक्त किंवा वापरास अयोग्य आहे का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांनी या पावडरचा कोणत्याही जनावरांच्या खाद्यासाठी वापर करू नये, तसेच या पदार्थापासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Jamkhed Milk Powder Dump
Onion Price Rise: पारनेरमध्ये कांद्याला तेजी; उच्च प्रतीच्या कांद्याला प्रतिकिलो ३१ रुपयांचा भाव

या प्रकरणाची वन विभाग, अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने चौकशी करून संबंधित पदार्थाचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत, तसेच हा साठा येथे टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकारामुळे पर्यावरण आणि जनावरांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. खर्डा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उज्ज्वलसिंह रजपूत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असून, ते लवकरच घटनास्थळी भेट देऊन पाहणी करणार असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news