

नगर: भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने अहिल्यानगर शहरातील अहमद निजाम शाह यांच्या स्मारकस्थळी मंगळवारी दादासाहेब रूपवते हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या हर घर तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या हर घर तिरंगा, भारत माता की जय, वंदे मातरम आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय अंतर्गत भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने त्यांच्या अखत्यारित असलेल्या ऐतिहासिक संरक्षित स्थळांच्या ठिकाणी ‘हर घर तिरंगा त यात्रेचे आयोजन करण्याचे निर्देश आहेत. (Latest Ahilyanagar News)
त्यानुसार भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण औरंगाबाद मंडळ प्रमुख अधीक्षक पुरातत्त्वज्ञ डॉ.शिवकुमार भगत यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर उपमंडलमधील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण अंतर्गत येणार्या ऐतिहासिक ठिकाणी हर घर तिरंगा यात्राचे आयोजन टोंब ऑफ निजाम अहमदशहाच्या स्मारक स्थळी करण्यात आले होते.
या यात्रेत इतिहास तज्ज्ञ भूषण देशमुख, दादासाहेब रुपवते विद्यालयाचे सर्व शिक्षक व विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण व अहिल्यानगर उपमंडळ कार्यालयाचे संवर्धन सहाय्यक संतोष महाजन, शिवाजी गायकवाड, संदीप हापसे, सतीश भुसारी, करीम शेख आदी कर्मचार्यांनी यात्रेचे नियोजन केले.
बहुजन शिक्षण संघाच्या दादासाहेब रुपवते विद्यालयाचे पर्यवेक्षक जयंत गायकवाड, महेंद्र कदम, संजीवन साळवे, अजय भिंगारदिवे, अनिता हंगेकर, सुनीता पटेकर, नितीन कसबेकर यांच्या संचालनात इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी व विद्याथिर्ंनी या यात्रेत उत्साहाने सहभाग नोंदवला. दादासाहेब रूपवते हायस्कूलपासून रॅलीस प्रारंभ झाला. ही रॅली बालिकाश्रम रोड, साताळकर हॉस्पिटल, बागरोजा हडको परिसरातून थेट अहमदशहा स्मारकावर पोहचली.