Agricultural pump wire theft: एकाच रात्री 7 कृषिपंपांतील तारेची चोरी; पठारवाडी परिसरात चोरट्यांची टोळी पुन्हा सक्रिय

काही कृपिपंपांची केबलही चोरून नेली आहे.
Agricultural pump wire theft
एकाच रात्री 7 कृषिपंपांतील तारेची चोरी; पठारवाडी परिसरात चोरट्यांची टोळी पुन्हा सक्रियPudhari
Published on
Updated on

Agricultural pump wire theft in Patharwadi

जवळा: पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथील धर्मा बाबा परिसरातील कुकडी कालव्यावर शेतकर्‍यांनी बसविलेल्या कृषिपंपांच्या तांबे तारेची चोरट्यांनी चोरी केल्याचा नेल्याची घटना 13 रोजी रात्री दोनच्या सुमारास घडली.

पठारवाडी शिवारात सुनील सुपेकर, सुनील पठारे, शंकर ढवळे, नीलेश पठारे आदी शेतकर्‍यांनी कुकडी कालव्यावर बसविलेल्या सात कृषिपंपांची तोडफोड करून त्यांनी त्यातील तांब्याच्या तारा काढून नेल्या. काही कृपिपंपांची केबलही चोरून नेली आहे.  (Latest Ahilyanagar News)

Agricultural pump wire theft
Rahuri Crime: ‘कांद्यावर फवारा मारायला चल’ म्हणत पतीकडून पत्नीला बेदम मारहाण

अनेक दिवसांपासून या परिसरात कृषिपंपांतील तांब्याच्या तारा व केबल चोरून नेण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. परंतु पोलिसांना चोरट्यांचा काही तपास लागत नाही. त्यामुळे त्यांचे आणखीच धाडस वाढत चालले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून जवळा, पठारवाडी, गाडीलगाव, गुणोरे, सांगवी सूर्या, राळेगण थेरपाळ, कोहोकडी परिसरात चोर्‍या करणार्‍यांची टोळी सक्रिय झाली असून अनेकवेळा चोर्‍या करूनही ते पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरत आहे, शेतकरी पोलिसांकेड तक्रार देण्याच्या फंदात पडत नाहीत. त्यामुळे चोरट्यांचे मात्र चांगलेच फावत आहे.

Agricultural pump wire theft
Crime News: विवाहितेवर घराच्या अंगणातच अत्याचार; आरोपीला अटक

त्यामुळे ते याचा गैरफायदा घेत आता आणखी धाडसाने अशा प्रकारच्या चोर्‍या करू लागले आहेत. यामध्ये मात्र शेतकर्‍यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे.तसेच शेतीमालांनाही फटका बसत आहे. या परिसरात लवकरच कांदा लागवडी चालू होत असून सोयाबीन व इतर पिकांनाही पावसाने ओढ दिल्यामुळे पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे.

परंतु अशा ऐनवेळेस कृपिपंपांची केबल व त्यातल्या तारा चोरून नेण्याचे प्रकार वाढल्यामुळे शेतकर्‍यांन आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. अशा प्रकारच्या चोर्‍या करणार्‍या टोळीचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news