Sina River Flood: पुराचे पाणी अहिल्यादेवींच्या दारात

शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Jamkhed News
पुराचे पाणी अहिल्यादेवींच्या दारातPudhari
Published on
Updated on

जामखेड: गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पावसामुळे सीना नदीला आलेल्या महापुराने तालुक्यातील सीना नदीकाठच्या 15 गावांना मोठा फटका बसला आहे. जवळा, आगी, पिंपरखेड, फक्राबाद, चौंडी आदी गावांमध्ये हाहाकार उडवला आहे.

सीना नदी काठच्या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून उसाचे पीक व जमिनीसह वाहून गेले आहे. सीना नदीवरील पुराच्या पाण्याने सर्वच बंधाऱ्यांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (Latest Ahilyanagar News)

Jamkhed News
Mohri lake breach risk: मोहरी तलाव फुटण्याचा धोका टळला! आ. पवार यांच्याकडून पोकलेन, जेसीबी आणि हजार गोणी सिमेंटची मदत

ह्या पुराच्या पाण्याचा फटका पुण्यलोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मभूमी असलेल्या या ऐतिहासिक चोंडी गावातील अहिल्यादेवी मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले असून, परिसरातील शेती आणि घरे उद्ध्वस्त झाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नदीचे पात्र 100 ते 300 मीटरपर्यंत बाजूच्या शेतांतून पाणी वाहत असून, पाणीपातळी 10 मीटर उंचावली आहे. स्थानिकांनी मदत मागितली असून, प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू केले आहे.

Jamkhed News
Karjat Heavy Rain: कर्जत उपकोषागार कार्यालय पाण्यात... कागदपत्रांचे नुकसान; कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला

सीना नदीच्या महापुराने जामखेड तालुक्यातील चोंडी, कवडगाव, गिरवली, देवकरवस्ती, आगी आणि जवळा या गावांनाही धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांसह जमीनदेखील वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तरडगाव येथे खैरी नदीच्या पुरामुळे दौंडाची वाडी रस्त्यावर अडकलेल्या 7 जणांची महसूल प्रशासन व स्थानिक नागरिकांनी सुटका केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news