Shrirampur truck ambulance accident: नेवासा रोडवर मध्यरात्री भीषण अपघात! ट्रक-ॲम्ब्युलन्सच्या धडकेत चालक गंभीर

दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान
Shrirampur truck ambulance accident
Shrirampur truck ambulance accidentPudhari
Published on: 
Updated on: 

श्रीरामपूर: शहरातील नेवासा रोडवर ओव्हरब्रीज जवळ काल शुक्रवारी रात्री साडेअकरा ते १२ वाजेच्या सुमारास मालवाहतूक ट्रक आणि ॲम्ब्युलन्सचा भीषण अपघात होवून ॲम्ब्युलन्स चालक गंभीर जखमी झाला आहे.

अपघातात जखमी झालेल्या चालकाला उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविले आहे. ॲम्ब्युलन्सच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून ट्रकचे पुढील दोन्ही चाके निखळुन बाहेर आले आहे.

नेवासा रोडवरील ओव्हर ब्रीजजवळ श्रीरामपुरकडे येत असलेल्या ॲम्ब्युलन्स चालकाने उसाचा जुगडला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना नेवाशाकडे जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकला जोरदार धडक दिली.

यात ॲम्ब्युलन्स चालक गंभीर जखमी झाला असून जखमी चालकाला वैद्यकीय उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले आहे. या धडकेमुळे ॲम्ब्युलन्सचा पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला असून दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

Shrirampur truck ambulance accident
Pathardi Reel Star Case: रीलस्टार निघाले लुटारू! माय-लेकाला मारहाण करून ६९ हजारांचा ऐवज लंपास

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

नेवासा रोडवर वारंवार अपघात होत असल्याने या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. रस्त्याची अपुरी रुंदी आणि वाढत्या वाहतूकीमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची चिंता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Shrirampur truck ambulance accident
Fishermen financial aid: पावसाअभावी मत्स्यव्यवसायाला मोठा फटका; मच्छिमारांना मदतीचे नितेश राणेंचे संकेत

या मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करावे, आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात आणि संबंधित प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news