Shrirampur Onion Market: श्रीरामपुरात कांदा ३५०० रुपयांवर

कांद्याला प्रति क्विंटल किमान ३०० रुपयांपासून ते कमाल ३ ५०० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला.
Onion
OnionPudhari File Photo
Published on
Updated on

श्रीरामपूर: श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मुख्य बाजार आवारातील लिलावात एकूण २० हजार ६९४ गावरान कांदा गोण्यांची आवक झाली. कांद्याला प्रति क्विंटल किमान ३०० रुपयांपासून ते कमाल ३ ५०० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला.

बाजार आवारात गावरान कांद्याच्या दर्जानुसार वेगवेगळ्या प्रतवारीचे लिलाव पार पडले. 'नंबर १' च्या कांद्याला किमान २४०० ते कमाल ३२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. 'नंबर २' चा कांदा किमान १७०० ते कमाल २३५० रुपये, तर 'नंबर ३' काद्याला किमान ९०० ते कमाल १६५० रुपये भाव मिळाला.

Onion
Alandi Flood Loss: पाणी ओसरलं... पण संकट कायम! लाखोंचे नुकसान अन् वेदना कायम

याशिवाय, 'गोल्टी' कांद्याला किमान १२०० ते कमाल २४०० रुपये तर, 'खाद' प्रति क्विंटल किमान ३०० ते कमाल ८५० रुपये असा बाजारभाव मिळाला.मुख्य आवकाव्यतिरिक्त बाजारात आलेल्या काही 'अपवादात्मक' दर्जाच्या कांद्याला सर्वाधिक चांगला भाव मिळाला.

३०० गोण्यांच्या एका अपवादात्मक लॉटला ३,५०० रुपये प्रति क्विंटल असा एकसमान उच्चांकी दर मिळाला, तर ३५० गोण्यांच्या दुसऱ्या लॉटला किमान कमाल ३,२०० रुपयांचा भाव मिळाला.

Onion
Junnar Onion Price Increase: ओतूर उपबाजारात कांदा तेजीत; शेतकऱ्यांना दिलासा

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा गोणी लिलावा दर आठवड्याला सोमवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवशी नियमितपणे पार पडतात, अशी माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news