Shrirampur Black Magic Case: श्रीरामपूरमध्ये काळ्या जादूचा प्रकार; जावयाला रंगेहात पकडले

सासरच्या घरासमोर अघोरी कृत्य; कुटुंबीयांची पोलिसांत तक्रार, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची धाव
Black Magic
Black MagicPudhari
Published on
Updated on

श्रीरामपूर: रात्रीचा एक वाजलेला, घरातील सर्वजण गाढ झोपलले. अशातच घराबाहेर काहीतरी हालचाली सुरू असल्याचा कानोसा लागला. बाहेर येऊन पाहतो तर काय, काही इसम हे हळदी, कुंकू, गुलाल, टाचणी टोचलेले लिंबं त्याचबरोबर सोबत नायलॉन दोरी, कुऱ्हाड, एक गलोर असे साहित्याची पूजा करत असल्याचे दिसले. आरडाओरडा झाला, ते पळू लागले.. एक जण सापडला आणि उजेडात पाहतो तर काय, हा जावईच. याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दिली.

Black Magic
Ahilyanagar ST Smart Card Charges: एसटी स्मार्ट कार्डसाठी जादा वसुली?; 220 रुपये घेऊन 199 ची पावती

मात्र, जावयानेच घरासमोर काळ्या जादुचा प्रयोग केल्याचे समोर येताच, संबंधित कुटूंब घाबरून गेले. मअनिसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांची भिती दूर केल्याचे दिसले. आपल्या घरासमोर काळी जादू केली असून ती जावयानेच केली असल्याची तक्रार सासऱ्याने थेट पोलिसात केली. दरम्यान, आपल्या घरासमोर अघोरी कृत्याच्या या घटनेमुळे घाबरलेल्या कुटुंबीयांची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेऊन त्यांच्या मनातील भीती दूर केली.

Black Magic
Maharashtra Onion Mahabank: राज्यात उभारणार कांदा महाबँक; समृद्धी महामार्गावर पाच ठिकाणी सुविधा

गुरुवारी रात्री एक वाजेच्या सुमारास देवळाली प्रवरा येथील एका वस्तीवर तीन ते चार इसम आले. त्यांनी गेटचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला व घरासमोर लिंब, हळदीकुंकू, काळी बाहुली टाकून उंबऱ्याची पूजा केली. अंगणात देखील पूजा सुरू केली. याची खबर खोलीत झोपलेल्या कुटुंबाला लागताच ते खडबडून जागे झाले. त्यांनी दरवाजा उघडून पाहिला असता समोर तीन ते चार इसम हळदी, कुंकू, गुलाल, टाचणी टोचलेले लिंबं त्याचबरोबर सोबत नायलॉन दोरी, कुऱ्हाड, एक गलोर असे साहित्याची पूजा करत असल्याचे लक्षात आले. कुटुंबीयांनी आरडाओरड करताच ते चारही इसम पळू लागले. त्यातील एका इसमास पकडण्यात कुटुंबीयाला यश आलं. त्यांनी जो इसम पकडला तो त्यांचाच जावई निघाला हे विशेष.

Black Magic
Sangamner Hailstorm: संगमनेरमध्ये गारपीट-वादळी पावसाचा तडाखा; पिके आणि घरांचे नुकसान, मुलगी जखमी

त्यांनी त्यास पकडून ठेवले व पोलिसांच्या ताब्यात दिले. काही दिवसापूर्वी त्यांची विवाहित मुलगी मयत झाली होती व या कुटुंबीयांनी तिचा नवरा सासू-सासरे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याचा राग मनात धरून काही देवलाशी बुवा बाबांना हातशी धरून त्या जावयाने त्यांच्या घरासमोर ही काळी जादू केल्याचा प्रकार घडला असावा असा दाट संशय संबंधित कुटुंबीयांना आला .शिवाय त्यांच्या सोबत कुऱ्हाड नायलॉन दोरी ग्लोबल असल्यामुळे आमचा घातपात तर करायचा नव्हता ना अशी शंका आली. तो जावई फौजी असल्यामुळे आमच्या जिवीतास धोका असल्याचे कुटुंबियानी अंनिसच्या कार्यकर्त्यांना सांगितले.

Black Magic
Ashok Kharat: अशोक खरात प्रकरण; भोंदूबाबाच्या काळ्या पैशांचा आणि संपत्तीचा तपास वेगात

या घटनेमागे जो कुणी बुवा बाबा असेल ज्याने अशा प्रकारची पुजा करुन आम्हाला घालविण्याचा प्रयत्न केला त्याचाही शोध घेवुन कारवाई करावी अशीही मागणी केली आहे. सदर घटना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यसचिव ॲड. रंजना गवांदे, अशोक गवांदे, माजी जिल्हा संघटक देविदास देसाई यांना समजताच ते तातडीने देवळाली प्रवरा येथे गेले.त्या भयग्रस्त कुटुंबाची भेट घेतली व त्यांच्या मनातील भीती दूर केली. याबाबत संबंधित कुटुंबीयांनी राहुरी पोलिस स्टेशनला जाऊन संबंधित इसमाविरोधात फिर्याद दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news