

Shirdi Sai Baba Temple
शिर्डी : चंद्रग्रहणामुळे आज (दि. ७) शिर्डीच्या साईबाबा मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमात बदल करण्यात आले आहेत. ग्रहणाच्या वेळेनुसार रात्री साईबाबा समाधी मंदिर लवकर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रहणकाल लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने हा बदल केला आहे, या बदलाची नाेंद घ्यावी, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.
मंदिर व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, आजची श्रींची शेजारती रात्री ९.१५ वाजता सुरू होईल. ही आरती झाल्यावर, रात्री १० वाजता समाधी मंदिर पूर्णपणे बंद केले जाईल. ग्रहणाचा कालावधी संपेपर्यंत मंदिर बंद राहणार असून, त्यानंतरच पुढील धार्मिक कार्यक्रम आणि दर्शनासाठी मंदिर पुन्हा उघडले जाईल. साईभक्तांनी या बदललेल्या वेळेची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.
पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये जाते अन् चंद्रावर सावली पडते. त्यामुळे चंद्राला लालसर रंग देते. यालाच खग्रास चंद्रग्रहण म्हणतात. हा योग रविवारी, 7 सप्टेंबर रोजी येत असून ग्रहणाचा स्पर्शकाळ रात्री 9.30 पासून तर मोक्षकाळ उत्तर रात्री 1.30 वाजता होणार आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार, खग्रास चंद्र ग्रहणाचा स्पर्श 7 सप्टेंबर 2025 च्या रात्री 09:57 वाजता असून ग्रहण मोक्ष मध्यरात्री 01:27 वाजता आहे. हे चंद्रग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात लागत असल्यामुळे 'चंद्रग्रहे ग्रहणप्रहरादर्वाक् यामत्रयं वेधः' या वचनानुसार 7 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12.32 पासून ग्रहणवेध सुरू होतो. लहान मुले, अशक्त, आजारी, वृद्ध व गर्भवती स्त्रियांनी सायं. 05.10 पासून वेध पाळावेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार, या ग्रहणाचा स्पर्श रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी होईल आणि मोक्ष मध्यरात्री १ वाजून २७ मिनिटांनी होईल. या चंद्रग्रहणाचा वेध दुपारी १२ वाजून ३२ मिनिटांनी सुरू होईल. लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांसाठी वेधकाळ सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी सुरू होईल.