Shirdi Guru Purnima Festival: शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; ४५ पालख्या, लाखो साईभक्तांच्या स्वागतासाठी साईसंस्थान सज्ज

२८ ते ३० जुलैदरम्यान विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम; १.६६ लाख सभासदांना निमंत्रण, ६८ हजार चौ.फुट मंडप व विशेष दर्शन व्यवस्था
Shirdi Guru Purnima Festival
Shirdi Guru Purnima FestivalPudhari
Published on
Updated on

शिर्डी: श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने यावर्षी मंगळवार दि. २८ ते गुरुवार दि. ३० जुलै याकाळात श्री गुरुपौर्णिमा उत्‍सव साजरा करण्‍यात येणार आहे. त्यासाठी साईसंस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Shirdi Guru Purnima Festival
Ahilyanagar Municipal House Tax Survey: घरपट्टीवरून महापालिकेत रणकंदन; संतप्त नगरसेवकांची घोषणाबाजी, कागदपत्रे भिरकावली

श्री साईबाबा संस्‍थाकडून श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाच्‍या १,६६,५६० भक्‍तमंडळ सभासदांना निमंत्रण पत्रिका पाठविण्‍यात आलेल्‍या असून, संदेश व इ-मेलद्वारे ३,५२,८२३ देणगीदार साईभक्‍तांना आमंत्रित करण्‍यात आले आहे. फुलांच्‍या सजावटीमध्‍ये वेगवेगळ्या देशी व विदेशी प्रकारच्‍या फुलांच्‍या समावेशातून श्री साईबाबांची प्रतीमेसह हत्‍ती व विविध प्रकारचे पक्षी साकारण्‍यात येणार आहेत. तसेच उत्‍सवकाळात विविध धार्मिक व सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

Shirdi Guru Purnima Festival
Milk Price: दुधाला 70 रुपये हमीभाव द्या; दूध उत्पादक शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी

याही वर्षी श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवा निमित्‍त वेगवगळया ठिकाणांहुन येणाऱ्या ४५ पालख्‍यांनी नोंदणी केलेली आहे. उत्‍सवात होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून दर्शनाची व्‍यवस्‍था सुखकर व्‍हावी, तसेच भाविकांचे पावसापासुन संरक्षणाकरीता मंदिर व संस्‍थान परिसरात सुमारे ६८ हजार चौ.फुट मंडप उभारण्‍यात आलेला आहे.

Shirdi Guru Purnima Festival
Vikhe Patil Statement| सरकार चर्चा करायला तयार: मंत्री विखे

तसेच साईभक्‍तांच्‍या अतिरिक्‍त निवासव्‍यवस्‍थे करीता साईबाबा भक्‍त निवासस्‍थान (५०० रुम), साईधर्मशाळा याठिकाणी सुमारे २८ हजार चौ.फुट निवासी पावसाळी मंडप, बिछायत व कनातीसह मंडपाची उभारणी करण्‍यात आलेली असून यामध्‍ये विद्युत, पाणी पुरवठा, स्‍वच्‍छतागृह व सुरक्षा व्‍यवस्‍था ठेवण्‍यात आलेली आहे.

Shirdi Guru Purnima Festival
Wari Special ST Bus: वारकऱ्यांसाठी लालपरी आता थेट गावात! पारनेर आगाराच्या ३० विशेष गाड्या धावणार

श्री साई प्रसादालयात तीन दिवस मिष्ठान्न भोजन प्रसाद, तसेच दर्शनरांगेत व परिसरात भक्‍तांना चहा, कॉफी व दुधाची व्यवस्था, वेगवेगळ्या ठिकाणी प्रथमोपचार केंद्रही कार्यान्वित असणार आहेत. या उत्‍सवास साईभक्‍तांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी, असे आवाहन गाडीलकर यांनी केले आहे.

या सोहळ्यासाठी संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश शिवाजीराव कचरे, समिती सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उप कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली संस्‍थानचे सर्व कर्मचारी प्रयत्‍नशिल आहे.­

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news