Shingve Keshav lake destruction: शिंगवे केशवचा एकमेव तलाव उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न; जेसीबी कारवाईविरोधात शेतकरी आक्रमक

खासगी व्यक्तीकडून बेकायदेशीर खोदकाम; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
JCB
JCBPudhari
Published on
Updated on

चिचोंडी शिराळ : पाथर्डी तालुक्यातील शिंगवे केशव येथील गावाचा एकमेव तलाव काही खासगी व्यक्ती जेसीबीद्वारे खोदकाम करून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सदरचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी पाथर्डीचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जलसंधारण विभाग व ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदन दिले आहे.

JCB
Nevasa water supply issue: नेवासा शहराचा पाणीप्रश्न मार्गी? नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले थेट ‘ग्राउंड झिरो’वर

शिंगवे केशव गावाच्या पश्चिमेकडील ओढ्यावर गट क्रमांक 1, 9, 10 व 409 मध्ये सन 1986-87 दरम्यान जिल्हा परिषदेने शेतकऱ्यांच्या संमतीने तलावाची उभारणी केली होती.

या तलावासाठी कोणतेही भूसंपादन झालेले नसले तरी, शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांच्या सहमतीने हा तलाव उभारण्यात आला होता. मात्र, 2018 मध्ये गट नं. 409 मधील काही क्षेत्र खरेदी करून खासगी व्यावसायिकाने तलाव नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

JCB
Shrirampur leopard sighting: ऊस तोडीत थरार! बछड्यासह बिबट्या समोर आल्याने मजुरांची उडाली धावपळ

सदर व्यक्तीने क्षेत्र खरेदीपूर्वीच तलाव, ओढा, दगडी सांडवा, भरावाचे दगडी अस्तरीकरण पाहूनच जमीन घेतली होती. असे असतानाही तलावाचा माती भराव, दगडी सांडवा भिंत व अस्तरीकरणाचे नुकसान जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी वारंवार समजावून सांगूनही संबंधितांकडून काम थांबवले गेले नाही.

मागील आठवड्यात संबंधित व्यक्तीने जे.सी.बी. मशीनच्या साह्याने माती भरावालगत नाली खोदण्याचे बेकायदेशीर काम सुरू केले. या नालीमुळे तलावात पाणी साठण्याऐवजी ते थेट सांडव्यातून बाहेर वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, मागील महिन्यातच सुमारे 500 फूट ओढा सपाट करून जवळपास एक एकर क्षेत्रावर अतिक्रमण करण्यात आले असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

JCB
Sangamner House Burglary: संगमनेर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री दोन बंद घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास

शिंगवे शिवारात हा एकमेव तलाव असून, तो वांबोरी पाईप चारी योजनेत समाविष्ट आहे.लवकरच वांबोरी चारीचे पाणी सुरू होणार असून, गावातील बहुतांश शेती याच तलावावर अवलंबून आहे. अशा स्थितीत तलाव उद्ध्वस्त झाल्यास शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत अवैध व नियमबाह्य नाली खोदकाम त्वरित बंद करावे, दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा शेतकरी तीव्र आंदोलन करतील, असा स्पष्ट इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news