Satyajeet Tambe: छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ‘सीबीएसई’मध्ये अवघ्या 68 शब्दांत हे अत्यंत निषेधार्य - सत्यजित तांबे

आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केला विधान परिषदेत प्रश्न
Satyajeet Tambe News
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ‘सीबीएसई’मध्ये अवघ्या 68 शब्दांत हे अत्यंत निषेधार्य - सत्यजित तांबेfile photo
Published on
Updated on

संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रेरणादायी इतिहास सीबीएसईच्या अभ्यासक्रमात अवघ्या 68 शब्दांमध्ये मांडला असून हे अत्यंत निषेधार्य आहे, तातडीने यामध्ये दुरुस्ती करावी आणि हा इतिहास अभ्यासक्रमात सविस्तर समाविष्ट करावा, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार तांबे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारकडे ही मागणी केली. यावेळी आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या पुढाकारामुळे आता सीबीएसईच्या धर्तीवर एनसीईआरटीचा अभ्यासक्रम सर्वच शाळांमध्ये लागू होणार असून, हा निर्णय स्वागतार्ह आहे. (Latest Ahilyanagar News)

Satyajeet Tambe News
Manoj Jarange Patil Protest: मुंबईतील 29 ऑगस्टचे आंदोलन आरपारची लढाई: मनोज जरांगे

मात्र, या अभ्यासक्रमातील पहिली ते दहावीच्या सीबीएसई इतिहासाच्या अभ्यासक्रमात एकूण 2200 पाने असताना, त्यात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ 68 शब्दांत उल्लेख करण्यात आला आहे. हे अत्यंत निषेधार्ह आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांना शिकवला गेला पाहिजे. यासाठी राज्य शासनाच्या वतीने तातडीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी तांबे यांनी केली. यावर शासनाची पुढची भूमिका काय आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थितीत केला.

Satyajeet Tambe News
Minor girl Assault: वळणे येथे अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार; आरोपीस ग्रामस्थांनी दिला चोप

या मुद्द्यावर उत्तर देताना शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, सीबीएसईचा अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) तयार करते, तर राज्यस्तरीय अभ्यासक्रम राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) तयार करते. मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव अभ्यासक्रमात झाला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

राज्यमंत्री भोयर यांनी स्पष्ट केलं की, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात दिल्लीला जाऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास सीबीएसई सातवी व दहावीच्या पुस्तकांमध्ये सन्मानपूर्वक समाविष्ट होण्यासाठी केंद्र सरकारकडून आश्वासन देण्यात आले आहे. पाठपुरावा करण्यासाठी आ. तांबे यांच्यासह आम्ही सर्व जण दिल्लीला जाऊ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news