

संगमनेर: नाशिक पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताना शिक्षक, बेरोजगार, पदवीधर, डॉक्टर, इंजिनिअर, शेतकरी यांच्यासह समाजातील सर्व घटकांचे विविध प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडले असून सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करू, असे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले.
संगमनेर येथे पावसाळी अधिवेशनात केलेल्या कामाची माहिती देताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, एनएसयुआय या विद्यार्थी चळवळीतून आपण काम करत पुढे आलो. अधिवेशनात सर्व सरकारी कर्मचार्यांना कॅशलेस मेडिकल सुविधा मिळावी याकरताची प्रभावी मागणी केली असून याकरता समिती स्थापन झाली आहे. (Latest Ahilyanagar News)
याच बरोबर अर्धा तास होणार्या चर्चेमध्ये 4 विषय मांडले. यामध्ये शेतकर्यांचा कांदा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा असून यावर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे. 14 औचित त्याचे मुद्दे उपस्थित केले. 93 अन्वये 4 विशेष सूचना मांडल्या. तर पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये 12 सूचना सूचना मांडून सरकारचे लक्ष वेधले आहे आहे.
शेतकर्यांचे मोठे बिकट प्रश्न आहे. पदवीधर युवकांचा रोजगारीचा प्रश्न आहे. शिक्षकांचे प्रश्न आहेत, वकील बांधवांना संरक्षण द्यावा या कायद्याकडे आपण लक्ष वेधले त्याचबरोबर आदिवासी आणि झोपडपट्टी विभागांमध्ये अनेक बोगस डॉक्टर कार्यरत असून ते सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळत आहेत.याबाबतचा प्रश्नही आपण मांडला आहे.
राज्यातील शेतकरी ,युवक, बेरोजगार, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, शासकीय कर्मचारी अशा अनेकांचे विविध प्रश्न आपण सातत्याने मांडले आहेत. 100 टक्के उपस्थित राहून विधिमंडळातील प्रश्नांबरोबरच विविध विभागाचे प्रश्न मंत्र्यांच्या करवी मार्गी लागण्याकरता सातत्याने पाठपुरावा केला आहे. माजीमंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांचा जनतेशी असलेल्या ऋणानुबंध त्यातून मिळालेले जनतेचे प्रेम या जोरावर मिळालेल्या संधीतून सोने करण्याचा आपला प्रयत्न असेही त्यांनी सांगितले.