

संगमनेर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार जसा तापतो आहे, तसा मंचावरचा रंगही वाढत आहे. त्यातच माजी खासदार सुजय विखे यांनी आपल्या खास अंदाजात शेरो–शायरी आणि मिश्कील डायलॉगच्या माध्यमातून थोरात गटावर जोरदार टीका करत सभेला अक्षरशः फुल टू एंटरटेनमेंट आणि तुफान फटकेबाजीची मेजवानी दिली.
गेल्या विधानसभा निवडणुकीत “टायगर अभी जिंदा है” ही टॅगलाइन गाजवणारे सुजय विखे पुन्हा एकदा त्याच जोशात रंगले. शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ यांच्या सभेसाठी ते रंगतदार भाषण देत असतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभेला उशीर होत असल्याने विखेंना वेळ सांभाळत भाषण वाढवावे लागले. यावर त्यांनी विनोदी अंदाजात म्हणाले “आम्ही टेस्ट मॅच खेळत नाही… ट्वेंटी–ट्वेंटी खेळतो! आणि रोज रात्री कपिल शर्मा शोही करत नाही!”
सभेत विखेंची टीका धारदार होती.
थोरात–तांबे गटावर त्यांनी फटकारा मारत म्हटलं
“इथे सेवा समिती नाही, मेवा समिती आघाडी आहे.”
सभेतले खास शेरो–शायरी डायलॉग प्रचंड गाजले
“मामा भांजे, कर्मचारी फौज तो तेरी सारी है पण स्टेजवर बसलेले आमचे 31 आजही तुमपे भारी आहेत.”
“संगमनेरमध्ये बिबटे, डुक्करं, मोकाट कुत्री पाहिली आता सिंहही पाहिला! टायगरला थांबवण्यासाठी सिंह आणलाय, पण वाघ–सिंहाच्या लढाईत वाघच जिंकतो.”
“अमोल खताळ ही बिल्डिंग असेल तर सुजय विखे त्या बिल्डिंगचं फाउंडेशन आहे. ती बिल्डिंग आम्ही पडू देणार नाही.”
याचबरोबर, संगमनेरच्या मागील 40 वर्षांच्या विकासावरही त्यांनी सवाल उपस्थित केला
“यांचा स्वर्ग म्हणजे कचऱ्याचा डोंगर, गटारी आणि डुक्करं… आणि आमचे उमेदवार फक्त चेहरे नाहीत, त्यामागे आहे संगमनेरचा विकास.”
संगमनेरमध्ये गेल्या वर्षभरात झालेले बदल त्यांनी लोकांना आठवून दिले आणि पुढील चार वर्षांत संगमनेरचा पूर्ण चेहरामोहरा बदलू, असा विश्वासही दिला
“विधानसभेला परिवर्तन केलं, आता पालिकेतही परिवर्तन करायचं आहे.”
शेवटी सुजय विखे म्हणाले
“ही माझी आवडती जागा आहे… इथे आल्यावर माझ्या अंगात येतं! व्यक्तिगत आरोप नकोत, विकास हवा. शांत राहा, सत्ता द्या, बदल हमखास देतो.”