Sangamner Sandalwood Smuggling: संगमनेरमध्ये चंदन तस्करीचा भांडाफोड; स्विफ्ट कारसह 5.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक ते श्रीरामपूर चंदन रॅकेट उघड; एक अटकेत, मुख्य सूत्रधार फरार
Sangamner Sandalwood
Sangamner SandalwoodPudhari
Published on
Updated on

संगमनेर: नाशिकहून श्रीरामपूरच्या दिशेने चंदनाची लाकडे घेऊन जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारला पोलिसांनी सापळा लावून ताब्यात घेतले. कारच्या तपासणीत 5 लाख 70 हजार रुपयांच्या चंदनाच्या लाकडी, कार अशा मुद्देमालासह एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Sangamner Sandalwood
Shrirampur Sand Mining Action: श्रीरामपूरमध्ये वाळू माफियांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’; 95 ब्रास वाळू जप्त, लाखोंचे साहित्य खाक

याबाबतची माहिती अशी की, गुरुवारी दि. 18 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लोणी परिसराच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून नाशिकहून चंदनाची लाकडे श्रीरामपूरकडे नेली जात असल्याची खात्रीशीर खबर मिळाली होती. या पथकाने संशयित वाहन पकडण्यासाठी तातडीने मोहिम राबवली. पोलिसांनी तळेगाव ते लोणी रोडवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम सेंटरसमोर सापळा लावला.

Sangamner Sandalwood
Ahilyanagar Municipal Election Voting: नगर जिल्ह्यात निवडणूक: 104 जागांसाठी आज मतदान, 376 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये

काही वेळातच संशयित कार येताना दिसली. पोलिसांनी तिला इशारा करून थांबवले. कारची झडती घेतली असता पोलिसांना त्यामध्ये 60 हजार रुपये किमतीची 30 किलो चंदनाची लाकडे, 5 लाख रुपयांची मारुती सुझुकी स्विफ्ट कार आणि 10 हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण 5 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला.

Sangamner Sandalwood
Geminid Meteor Observation: तारकांनी सजलेले नभांगण; जेमिनीड उल्कावर्षावाचे थरारक दर्शन

याप्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात वन कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी आणि त्यांच्या पथकातील राहुल द्वारके, भीमराज खर्से, राहुल डोके, प्रमोद जाधव, सतिश भवर, सुनील मालणकर आणि चालक महादेव भांड यांनी ही कारवाई केली आहे.

Sangamner Sandalwood
Ahilyanagar Panchyat Election: जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींना लागणार ब्रेक?

‌‘नाशिक ते श्रीरामपूर‌’ मोठे रॅकेट

या प्रकरणी पोलिसांनी हनुमंता भिमा मोरे (वय 45, रा. उंबरगांव, ता. श्रीरामपूर) याला अटक केली आहे. सखोल चौकशी केली असता, ही चंदनाची लाकडे त्याने उत्तम नारायण पवार (रा. सिन्नर, जि. नाशिक) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले. सध्या मुख्य सूत्रधार उत्तम पवार हा फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news