Kharif Crop Damage: अहिल्यानगरमध्ये खरीप पिकांचे नुकसान; १२ लाख शेतकऱ्यांसाठी १,३६५ कोटींची मदत अपेक्षित

गेल्‍या वर्षी अतिवृष्‍टीचा तर यंदा पावसाची दडीचा फटका
Drought Scarcity
Drought ScarcityPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: गेल्‍या वर्षी अतिवृष्‍टीमुळे खरीप हंगाम हाती लागला नाही. यंदा पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला आहे. त्‍यामुळे गेल्‍या वर्षी ८ लाख ३१ हजार शेतकर्‍यांना शासनाच्‍या मदतीवर राहावे लागले.

यंदा पावसानेच पाठ फिरवल्‍याने ९ लाख ६२ हजार ११७ हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाले. त्‍यामुळे जवळपास १२ लाख १५ हजार ६६९ बाधित शेतकर्‍यांना १३६५ कोटी १४ लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाला करावी लागणार आहे. सलग दोन वर्षे खरीप हंगाम हाती लागला नसून शेतकर्‍यांना शासनाच्‍या मदतीवर अवलंबून राहावे लागले आहे.

Drought Scarcity
Shrirampur News: श्रीरामपुरात पाणी प्रश्नावरून सभेत गदारोळ; आवर्तनासाठी सर्वपक्षीय नगरसेवक पालकमंत्र्यांना भेटणार

यंदा जुलै महिन्‍यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्‍याने शंभर टक्‍के पेरणी झाली. मात्र त्‍यानंतर पावसाने दडी मारली. त्‍यामुळे खरीप पिकांची वाढच झाली नाही. वाढ झालेल्‍या पिकांना दाणे भरली गेली नाहीत.

त्‍यामुळे शासनाने दुष्‍काळ जाहीर करुन खरीप पिकांचे पंचनामे करण्‍याचे निर्देश दिले. त्‍यानुसार ९ लाख ६२ हजार ११६ हेक्‍टरवरील पिकांचे ३३ टटक्‍यांपेक्षा अधिक नुकसान झाले. याचा आर्थिक फटका १२ लाख १५ हजार शेतकर्‍यांना बसला आहे. त्‍यामुळे या बाधित शेतकर्‍यांना दोन हेक्‍टरपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

Drought Scarcity
Ahilyanagar Water Shortage Action Plan: पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी अहिल्यानगर सज्ज! ४७० कोटींचा आराखडा तयार

हे अनुदान जिरायतीसाठी साडेआठ हजार रुपये हेक्‍टरी, बागायतीसाठी १७ हजार रुपये हेक्‍टरी तर फळबागांसाठी २२ हजार ५०० रुपये मदत दिली जाणार आहे. त्‍यासाठी जिल्‍हा प्रशासनाने नुकसानभरपाईसाठी १ हजार ३६५ कोटी १४ लाख रुपये इतका निधी अपेक्षित असल्‍याचा अहवाल शासनाला पाठविण्‍यात आला आहे.

गेल्‍या वर्षी अतिवृष्‍टीमुळे ६ लाख २६ हजार १८६ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. याचा आर्थिक फटका ८ लाख ३० हजार ६३७ शेतकर्‍यांना बसला होता. त्‍यामुळे बाधित शेतकर्‍यांना ८८० कोटी १५ लाख रुपयांची मदत शासनाने केली होती.

तालुकानिहाय अपेक्षित निधी कोटींत

नगर : ८३.९३, पारनेर : १०३.२९, पाथर्डी: १२३.०७, कर्जत : १५७. ९०, जामखेड : ७२.५४, श्रीगोंदा : १३७.३७, श्रीरामपूर : ४७.८४, राहुरी : ९४.७१, नेवासा : १४३.५८, शेवगाव : ११९.५३, , संगमनेर : १०८.६३, अकोले : ५८.८९, कोपरगाव : ५७.१२, राहाता : ५६.६९.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.