Ashok Kharat: समता पतसंस्थेत ६२ कोटींचा घोटाळा; बनावट खात्यांमुळे खळबळ

खातेधारकांचा नकार, भोंदू अशोक खरात अडचणीत; पोलिस तपासाला वेग
Ashok Kharat
Ashok KharatPudhari
Published on
Updated on

गोरक्ष शेजूळ

नगर: समता पतसंस्थेत भोंदू अशोक खरात नॉमिनी असलेल्या 12 खातेधारकांच्या खात्यांतून 6 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे रविवारी पोलिस तपासात समोर आले. दरम्यान या खातेदारांनीही ‌‘समता‌’तील खात्यांचा इन्कार केला असून ती खाती आणि व्यवहार आपले नसल्याचा जबाब नोंदविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Ashok Kharat
Ahilyanagar Solar Cable Theft: अहिल्यानगरमध्ये सोलर केबल चोरीचा पर्दाफाश; चौघांना अटक, 9.91 लाखांचा मुद्देमाल जप्त

राजेंद्र जासूद, दिनेश परब, दिशा परब यांच्यासह राजेश पोळ, सौ. पोळ, उमाकांत तावडे यांचे जबाब शिर्डी पोलिसांनी नोंदविले आहेत. समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत खरात नॉमिनी असलेली 57 खातेधारकांची 100 खाती असून त्यात सुमारे 60 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या खात्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून खातेदारांना नोटिसा बजावल्या आहेत. आजपर्यंत 19 खातेदारांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत. या सर्वच खातेदारांनी ‌‘समता‌’तील खाते आपले नसल्याचा जबाब दिला आहे. त्यामुळे भोंदू खरातसह समता पतसंस्थेच्या अडचणी वाढल्या आहेत.

Ashok Kharat
Ahilyanagar ST Bus Diesel Issue: अहिल्यानगरमध्ये एसटीला डिझेलचा फटका; तारकपूर- अकोले आगारातील फेऱ्या बाधित

समता पतसंस्थेत कधीच न गेलेल्या दिनेश परब व त्यांची पत्नी दिशा यांच्या नावे चार खाती उघडण्यात आली आहेत. ही खाती उघडतानाच्या अर्जावरील सह्याही बनावट आहेत. या चारही खात्यांना अशोक खरात नॉमिनी असून त्यानेच बनावट सह्या केल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे.

Ashok Kharat
Rahuri Bypoll NCP Candidate: राहुरी पोटनिवडणूक: राष्ट्रवादीकडून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल

आत्महत्येच्या फेरतपासाची मागणी

शिर्डी संस्थानमधील कर्मचारी विकास दिवटे यांनी 2022 मध्ये आत्महत्या केली होती. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या नातलगासह भोंदू अशोक खरात विरोधात त्यावेळी गुन्हाही दाखल झाला. मात्र भोंदू खरात विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही माहिती समजल्यानंतर फिर्यादी राजेंद्र दिवटे यांनी शिर्डी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनीही मागील गुन्ह्याची तपासणी सुरू केली. विकास दिवटे यांच्या आत्महत्येचा फेरतपास करावा, अशी मागणी करणारा अर्ज राजेंद्र दिवटे हे सोमवारी (दि.6) देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांचा अर्ज आणि न्यायालयाच्या परवानगीनंतर शिर्डी पोलिसांकडून 2022 मध्ये विकास दिवटे यांच्या आत्महत्येचा फेरतपासाचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Ashok Kharat
Pathardi Crime: पाथर्डीत पुजाऱ्याची आत्महत्या; कर्जछळ प्रकरणी तिघांवर गुन्हा, एक अटकेत

‌‘समता‌’तील 30 खात्यांचा उलगडा

समता नागरी पतसंस्थेच्या राहाता शाखेतील 100 आणि सिन्नरच्या जगदंबा पतसंस्थेतील 32 अशा 132 खात्यातून भोंदू खरातने 62 कोटी रुपयांची उलाढाल केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या सगळ्याच खात्यांची पडताळणी सुरू आहे. जगदंबा पतसंस्थेतील 32 खात्यांवर भोंदू खरातनेच ठेवी ठेवल्या, काढल्या आणि व्यवहारही केल्याचा जबाब त्या पतसंस्थेचा व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांनी शुक्रवारी पोलिसात दिला आहे. समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत खाते असलेल्या 19 खातेधारकांचे जबाब नोंदविल्यानंतर ते खातेही खरातने त्यांच्या बनावट सह्या करून उघडल्याचे समोर आले आहे. या 19 खातेधारकांच्या नावे जवळपास 30 खाते ‌‘समता‌’च्या राहाता शाखेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news