Rahuri Bypoll NCP Candidate: राहुरी पोटनिवडणूक: राष्ट्रवादीकडून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल

शेवटच्या दिवशी राजकीय हालचाली वेगात; विविध पक्षांचे उमेदवार रिंगणात
NCP Sharad Pawar
NCP Sharad PawarPudhari
Published on
Updated on

नगर: राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोमवारी (दि.6) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष तथा नगर जिल्हा निरीक्षक अंकुश काकडे यांनी दिली.

NCP Sharad Pawar
Pathardi Crime: पाथर्डीत पुजाऱ्याची आत्महत्या; कर्जछळ प्रकरणी तिघांवर गुन्हा, एक अटकेत

जिल्हा राष्ट्रवादीच्या बैठकीत ते बोलत होते. खा. नीलेश लंके, जिल्हाध्यक्ष दादा कळमकर, संदीप वर्पे, अरुण कडू, बाबासाहेब भोस, रावसाहेब म्हस्के, ॲड. प्रताप ढाकणे, शौकत तांबोळी यांच्यासह 11 तालुका प्रमुख बैठकीस उपस्थित होते.

NCP Sharad Pawar
Pathardi Bride Fraud Case: पाथर्डीत नवरीचा पलायन प्रकार; लग्नानंतर काही तासांतच दागिने घेऊन फरार

अकुंश काकडे यांनी दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचा विषय संपुष्टात आल्याचे स्पष्ट करताना जोमाने पक्ष बांधणी करण्याचे आवाहन केले. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची शोधाशोध आतापासूनच करावी. ऐनवेळी धावपळ नको म्हणून संभाव्य नावे शोधून ठेवावीत.

NCP Sharad Pawar
Ashok Kharat: नगर जिल्ह्यात पतसंस्थांमध्ये मोठा घोटाळा; खरातचे 62 कोटींचे व्यवहार उघड

महिन्यातील सात दिवस नगर जिल्ह्यासाठी देणार असून प्रत्येक तालुकास्तरावर पक्षाची बैठक घेतली जाईल, असे काकडे यांनी सांगितले. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. राहुरीची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात असून पोटनिवडणूकीत पक्षाकडून उमेदवार दिला जाणार असून सोमवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याचे काकडे यांनी यावेळी जाहीर केले.

NCP Sharad Pawar
Jamkhed Onion Farmers Crisis: जामखेडमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संकटात; अवकाळी पाऊस आणि भावघसरणीचा दुहेरी फटका

सोमवार शेवटचा दिवस!

सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. आजअखेर एकच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. काँग्रेसनेही या जागेवर उमेदवार देण्याचे घोषित केले आहे. याशिवाय भाकप आणि वंचितने उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनीही उमेदवारी करणार असल्याचे जाहीर केले आहे. दिवंगत शिवाजी कर्डिले यांच्या रिक्त जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केली असून ते सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news