Rahuri News: सासरचा छळ! व्हॉट्सॲप स्टेटसवर सुसाईड नोट ठेवत तरुणाने संपवल जीवन

कौटुंबिक वाद आणि मानसिक छळाचा आरोप
Rahuri News
Rahuri NewsFile Photo
Published on
Updated on

राहुरी: वळण येथे सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या छळाला कंटाळून एका तरुणाने व्हॉट्सॲप स्टेटसवर सुसाईड नोट ठेवत राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.याप्रकरणी पत्नीसह चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत ज्ञानेश्वर दत्तात्रय भाकरे हे पत्नी धनश्री व मुलीसह वळण येथे वास्तव्यास होते. पती-पत्नीमध्ये घरगुती कारणांवरून वारंवार वाद होत असे. सुमारे पाच महिन्यांपूर्वी झालेल्या वादानंतर धनश्री या माहेरी पैठण येथे गेल्या होत्या. त्यानंतर ज्ञानेश्वर यांच्या नातेवाईकांनी त्यांना सासरी परत पाठविण्याची विनंती केली होती.

Rahuri News
Ahilyanagar voter list revision: जिल्ह्यातील सव्‍वाचार लाख मतदारांची वगळणी; ३३ लाख ९४ हजार मतदारांची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध होणार

मात्र, सासरच्या नातेवाईकांनी त्यास नकार दिल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. ज्ञानेश्वर यांनी पत्नीला अनेकदा संपर्क करून वळण येथे परत येण्याची विनंती केली होती. मात्र, त्या परत आल्या नाहीत. तसेच सासरच्याकडून शिवीगाळ करून खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे ज्ञानेश्वर यांनी नातेवाईकांना सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

३१ जुलैच्या मध्यरात्रीनंतर ज्ञानेश्वर यांनी एका कागदावर सुसाईड नोट लिहून ती व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवली. त्यानंतर राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी गणेश दत्तात्रय भाकरे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार धनश्री ज्ञानेश्वर भाकरे (रा. वळण), संगिता खंडू काळे, अमोल खंडू काळे (दोघे रा. पैठण) व सुवर्णा संजय भाकरे (रा. वळण) या चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Rahuri News
Daund Police Action: दौंड शहरात मद्यपान करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; सात गुन्हे दाखल

सुसाईड नोटमध्ये, मी स्वतः ज्ञानेश्वर दत्तात्रय भाकरे आत्महत्या करीत आहे. माझ्या सासरच्या लोकांनी मला खूप त्रास दिला आहे. संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, असा मजकूर असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news