

राहुरी : महावितरणकडून नवीन स्मार्ट मिटर बसविण्याच्या सुरू असलेल्या मोहिमेला राहुरीकरांनी विरोध दर्शविला आहे. नवीन मीटर बसविणे तातडीने बंद करावे, अशी मागणी महावितरणकडे करण्यात आली.
जुने मीटर काढून त्याठिकाणी स्मार्ट टीओडी मीटर बसविले जात आहे. हे नवीन स्मार्ट मिटर बसविल्यानंतर जास्तीचे वीज बिल आल्याचे निवेदनात म्हटले आहे. नवीन स्मार्ट मिटर बसविण्याची सक्ती करू नये, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा महावितरण विभागाला इशारा देण्यात आला. (Latest Ahilyanagar News)
वसंतराव झावरे, प्रकाश दहिवाळकर, अशोक पवार, संतोष डागवाले, दीपक बारगळ, दीपक चव्हाण, तुकाराम वायाळ, बंडू आनंदकर, अनिल लुक्कड, विश्वास बुर्हाडे, मुकुंद मिसाळ, प्रफुल्ल उदावंत, बबनराव लांडगे, राजेंद्र होडगर, सुभाष दहाट, मारुती खरात, शामराव ढोकणे, गजानन तारडे, आकाश तनपुरे, अनिल निमसे, प्रशांत घोडके, मधुकर गाडे, अरुण टाकटे, गंगाधर वराळे, विलास उदावंत, अनिल डावखर, राजेंद्र मुंडलिक, कृष्णा ढाले, प्रीतम बोरा, दिलीप सरोदे, रणजीत काळे, रवींद्र दरक, शिरीष सुराणा, अनिल निकम, विलास आबारी, प्रवीण राऊत, नितीन गोसावी, गणेश भाटिया, श्रावण साळवे, दीपक चव्हाण, ज्ञानेश्वर पोपळघट, लक्ष्मीकांत बनसोडे, बाळासाहेब म्हसे यांच्या सह्यांचे निवेदन महावितरण कंपनीला देण्यात आले.