Police Rescue: २४ तासांत राहुरी पोलिसांचे कमाल! दोन अल्पवयीन मुलींचा सुखरूप शोध, ऑपरेशन मुस्कानचा विक्रम

२२ महिन्यांत ९७ मुली सापडल्या; मानसिक ताण, एकटेपणा आणि मोबाईल आहारी जाण्याने अशा घटना वाढल्याचा पोलिसांचा इशारा
Rescue
RescuePudhari
Published on
Updated on

राहुरी: राहुरी पोलिसांनी पुन्हा एकदा तत्परता आणि दक्षता दाखवत दोन अल्पवयीन मुलींचा चोवीस तासांच्या आत शोध घेऊन त्यांना पालकांकडे सुखरूप स्वाधीन दिले. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत चालू असलेल्या या मोहिमेत मागील 22 महिन्यांत शोधलेल्या मुलींची संख्या आता 97 वर पोहोचली आहे.

Rescue
Illegal Pistol: गोंधवणी शिवारात धडक कारवाई! दोन गावठी कट्टे, जिवंत काडतुसे जप्त; अल्पवयीन मुलांकडून विक्रीचा धक्कादायक उलगडा

राहुरी बु येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अज्ञात कारणांमुळे घरातून निघून गेल्याची तक्रार तिच्या पालकांनी रात्री आठ वाजता राहुरी पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. राहुरी पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली. तपासादरम्यान संबंधित मुलगी राहुरी रेल्वे स्टेशनजवळ रुळांच्या बाजूला दिसत असल्याची खबर मिळाली. तत्काळ पोलिस पथक घटनास्थळी पोहचले.

Rescue
Political Leader Attack: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला!

तेथे शोध घेतल्यावर मुलगी मानसिक तणावात आणि एकटी अवस्थेत आढळून आली. काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि पोलिसांच्या दक्षतेमुळे तिला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले. या कारवाईनंतर मुलीला तिच्या पालकांकडे सुरक्षित सोपविण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.तर दुसऱ्या घटनेत कात्रड येथील मुलगी 18 फेब्रुवारी 2025 रोजी अज्ञात व्यक्तीकडून पळवून नेल्याची तक्रार राहुरी पोलिसांकडे आली होती. तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि सलग शोध मोहिमेमुळे ही मुलगी अखेर पोलिसांना मिळाली असून तिला सुरक्षित तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Rescue
Multistate Deposit Fraud: भगवानबाबा मल्टीस्टेटमध्ये 5.63 कोटी अडकले! श्रीरामपूर शाखेवर फसवणुकीचा गुन्हा

या यशस्वी कारवाईसाठी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांनी मार्गदर्शन केले. तर कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते, हेडकॉन्स्टेबल संभाजी बडे, कर्मचारी संदीप ठाणगे, अंकुश भोसले, वंदना पवार यांच्यासह पथकाने केली.

Rescue
Election Reservation: अकोले-श्रीरामपूर आरक्षण 50% च्या पुढे; आजची सर्वोच्च सुनावणी ठरवणार मोठा निर्णय

दरम्यान, मुलांशी संवाद कमी होत असल्याने त्यांच्यात निर्माण होणारा ताण, भावनिक एकटेपणा आणि मोबाईलवरील आहारी जाण्यामुळे अशा घटना वाढताना दिसत आहे. मित्र-मैत्रिणींबाबत माहिती ठेवावी आणि मोबाईल वापरावर योग्य नियंत्रण ठेवावे, असे आवाहन राहुरी पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news