

राहुरी: ‘तु माझ्या आईच्या मौतीला का आली नाही’, याचा जाब विचारून दिराने भावजयीला शिवीगाळ करुन लाथाबूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा येथे घडली.
उषा चंद्रकांत वाघ, वय 49 वर्ष, रा. वाघाचा आखाडा, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. 6 जून 2025 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास उषा वाघ ह्या त्यांच्या घरासमोर असताना त्यांचा दिर नानासाहेब वाघ हा तिथे आला व मला म्हणाला की, तुम्ही माझी आई वारली तेव्हा मौतीला का आले नाही. (Latest Ahilyanagar News)
तेव्हा उषा वाघ ह्या त्याला म्हणाल्या की, तु नेहमी आमच्या सोबत वाद घालतो, त्यामुळे आम्ही मौतीला आलो नाही, असे उत्तर दिले. मात्र याचा त्याला राग आल्याने त्याने उषा वाघ ह्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने मारहान करुन त्यांना चावा घेतला.
तेव्हा उषा वाघ ह्याचा मुलगा सुनिल व नात चैताली हे सोडवासोडव करण्यासाठी आले असता त्यांना देखील शिवीगाळ करुन लाथा बुक्क्याने मारहाण केली. तसेच तुम्हाला दगडाने जिवे मारुन टाकीन, अशी धमकी दिली. उषा चंद्रकांत वाघ यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नानासाहेब मुंजाबा वाघ, रा. वाघाचा आखाडा, ता. राहुरी, याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.