Prajakt Tanpure Rahuri Election: कोणाला पाठिंबा द्यायचा... तनपुरेंचा 'सस्पेन्स' कायम; राहुरीतील चौरंगी लढत होणार चुरशीची?

Prajakt Tanpure Rahuri Election
Prajakt Tanpure Rahuri Electionpudhari
Published on
Updated on

Prajakt Tanpure Rahuri Election: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डिले, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे, वंचितचे संतोष साळके आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर रावसाहेब खेवरे यांच्यासह एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. या चौरंगी लढतीमुळे राहुरीच्या राजकारणात मोठी चुरस निर्माण झाली असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Prajakt Tanpure Rahuri Election
Rahuri By Election: भाजप प्रवेशाच्या चर्चांवर प्राजक्त तनपुरेंचे स्पष्टीकरण; राहुरी पोटनिवडणुकीबाबत सस्पेन्स कायम

दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले, महाविकास आघाडीचे गोविंद मोकाटे आणि बंडखोर रावसाहेब खेवरे यांनी आपल्या कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे यांनी मतदान केल्यानंतर भावूक होत सांगितले की, "बटन दाबताना साहेबांच्या (शरद पवार) आठवणी आल्या. हे मतदान म्हणजे साहेबांवरील प्रेमाचे प्रतीक आहे." तर, शेतकऱ्याचा मुलगाच आमदार होईल, असा विश्वास खेवरे यांनी व्यक्त केला.

Prajakt Tanpure Rahuri Election
Baramati Rahuri by-election : पोटनिवडणुकीत काँग्रेसची एंट्री; बारामती-राहुरीत रंगणार सामना

प्राजक्त तनपुरेंचा 'सस्पेन्स' कायम

या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा रंगली ती माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेची. निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला एक सोशल मीडिया पोस्ट केली. मात्र, यामध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा, याचा कोणताही स्पष्ट उल्लेख न करता केवळ 'घेतलेल्या निर्णयाचा सन्मान करा' असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. त्यामुळे तनपुरेंची मते कोणाच्या पारड्यात जाणार, याबाबत सस्पेन्स कायम आहे.

प्रसाद तनपुरे आणि उषा तनपुरे यांचे आवाहन

राहुरीतील प्रगती महाविद्यालयाच्या केंद्रावर माजी खासदार प्रसाद तनपुरे आणि माजी नगराध्यक्षा उषा तनपुरे यांनी मतदान केले. यावेळी उषा तनपुरे म्हणाल्या की, "संविधानाने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे, तो सर्वांनी बजावलाच पाहिजे." पराजक्त तनपुरे यांच्या निवडणुकीतून माघार घेण्याच्या निर्णयावर विचारले असता, त्यांनी आपल्या मुलाच्या निर्णयाचे समर्थन केले.

या पोटनिवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदारांचा कौल कोणाकडे आहे, हे आता निकालाअंतीच स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news