

राहाता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. नगराध्यक्ष पदासाठी 9 उमेदवार मैदानात आहेत.
यामध्ये महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी डॉ. स्वाधीन गाडेकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर, राहाता शहर विकास आघाडीकडून माजी उपनगराध्यक्ष धनंजय गाडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही लढत लक्ष्यवेधी ठरणार आहे.
नगराध्यक्ष पदासाठी आम आदमी पार्टीकडून रामनाथ सदाफळ व बहुजन समाज पार्टीकडून अनिल पावटे, राष्ट्रीय जनमंच पक्षाकडून बाळासाहेब गिधाड तसेच अपक्ष भानुदास गाडेकर, तुषार सदाफळ व राजेंद्र पठारे यांनी दोन अर्ज दाखल केले. त्यामध्ये एक अपक्ष तर एक शिवसेना उबाठाकडुनही आहे.
दरम्यान, शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी पालिकेमध्ये मोठी गर्दी उमेदवारांनी केली होती. आता छाननीनंतर दि.21 रोजी अखेरच्या दिवशी किती अर्ज वैध व कोण मागे घेतात, त्यावर प्रत्यक्ष लढत कोणात होणार हे स्पष्ट होईल.
मात्र नगराध्यक्ष पदासाठी डॉ स्वाधीन गाडेकर, धनंजय गाडेकर, राजेेंद्र पठाडे यांची लढत होणार आहे, असे संकेत आहेत. इतर राष्ट्रीय पक्षाचे व अपक्ष उमेदवार यांनीही विजयाचा दावा केला आहे.