Pulse Polio Vaccination: अहिल्यानगरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला मोठा प्रतिसाद; पावणेचार लाख बालकांना पोलिओ डोस

जिल्ह्यात 3,032 बूथवर लसीकरण; ३० जूनपासून घरभेटीद्वारे उर्वरित बालकांना पोलिओचे डोस देणार
Pulse Polio Vaccination
Pulse Polio VaccinationPudhari
Published on
Updated on

नगर: राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेअंतर्गत काल रविवार दि. २८ जून रोजी जिल्ह्यात शून्य ते पाच वयोगटातील तब्बल पावणेचार लाख बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी लसीकरण मोहीमेसाठी मायक्रो प्लॅनिंग केला होता.

Pulse Polio Vaccination
Ahilyanagar Rain Update: अहिल्यानगर जिल्ह्यात दमदार पाऊस; अंबित धरण ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

त्यानुसार, जिल्ह्यातील आरोग्य केंद्र, उपकेंद्र, त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयातही 3032 बूथवर वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविका अशा ८१३१ कर्मचाऱी सकाळपासूनच लसीकरणासाठी सज्ज होते. दिवसभरात बूथ, ट्रॉन्झिस्ट आणि मोबाईल पथकाव्दारे 3 लाख 71 हजार बालकांचे लसीकरण झाले.

Pulse Polio Vaccination
ZP School Locked: मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्याने जिल्हा परिषद शाळेला लावले कुलूप; विद्यार्थ्यांचे शिक्षण ठप्प

एकही लाभार्थी वंचित असणार नाही

दि. ३० जूनपासून ग्रामीण भागात तीन, तर शहरी भागात पाच दिवस घरभेटीद्वारे लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणापासून एकही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी जिल्ह्यातील बसस्थानके, रेल्वे स्थानके, विटभट्ट्या, बांधकामे, साखर कारखाने, सट्टे, रस्त्यावरील मजूर तसेच लोकांची गर्दी होणाऱ्या ठिकाणीही विशेष पथकांकडून डोस पाजण्यात येणार असल्याचे डॉ. नागरगोजे यांनी सांगितले.

Pulse Polio Vaccination
Parner Rain Deficit: पारनेरमध्ये ७० टक्के पावसाची तूट; खरीपाची केवळ ३ टक्के पेरणी, पाणीटंचाई गडद

ग्रामीण रुग्णालयातही लसीकरण मोहीम

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या मागरदर्शनात पाथर्डी उपजिल्हा रुग्णालय 1974, ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा 3418, राहुरी 3894, राहाता 2505 आणि शिर्डी 5325 अशा ठिकाणीही 17116 बालकांचे लसीकरण करण्यात आले.

Pulse Polio Vaccination
Sugar Factory Election Results: मुळा व वृद्धेश्वर साखर कारखाना निवडणुकीत गडाख-राजळे गटाचा दणदणीत विजय

जिल्ह्यातील आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांच्या माध्यमातून साधारणतः पावणेचार लाख बालकांना पोलिओचे लसीकरण करण्यात आले आहे. एकही बालक वंचित राहू नये, यासाठी प्रशासन तत्पर आहे. नागरीकांनीही आपल्या बालकांचे लसीकरण करून सहकार्य करावे.

डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news