Ahilyanagar PMAY Bribery Case: प्रधानमंत्री आवास योजनेत लाच प्रकरण; ग्रामसेविका-इंजिनिअरविरोधात गुन्हा, इंजिनिअर रंगेहाथ पकडला

घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी 10 हजारांची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
ACB Bribery Statistics
ACB Bribery StatisticsPudhari
Published on
Updated on

नगर: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाच्या अनुदानाचा दुसरा हप्ता मंजूर करण्यासाठी दहा हजारांची लाच मागितल्याच्या आरोपावरून ग्रामसेविका आणि कंत्राटी इंजिनिअरवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. त्यातील कंत्राटी इंजिनिअरला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभगााच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी निमगाव घाणा (ता. अहिल्यानगर) रस्त्यावर सायंकाळी उशिरा झाली.

ACB Bribery Statistics
Ahilyadevi Holkar Jalyatra: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्षानिमित्त ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे आयोजन

अधिक माहिती अशी, तक्रारदाराच्या वडिलांनी सन 2023 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ग्रापंचायत कार्यालय खारेखर्जुने येथे नाव नोंदविले होते. 2024 मध्ये यादीत नाव आल्यानंतर त्यांच्या खात्यात 15 हजार रुपये अनुदान जमा झाले. मात्र, पुढील टप्पा मंजुरीसाठी ग्रामपंचायत कर्जुने खारे येथील ग्रामसेविका पुष्पा डेरे यांनी 10 हजार रुपयांची लाचेची मागणी केली.

ACB Bribery Statistics
Ahilyanagar Government Employees Strike: अहिल्यानगरात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; कार्यालये ठप्प, शाळा बंद

दरम्यान, पंचायत समितीतील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता (इंजिनिअर) गौतम सूर्यवंशी यांनीही स्वतंत्र 10 हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाच्या पथकाने पडताळणी सापळा लावला असता त्यात दोघांनी प्रत्येकी 5 हजार रुपये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर विभागाने सापळा रचला. तक्रारदार पैसे देण्यासाठी डेरे यांच्याकडे गेले असता त्यांनी रक्कम सूर्यवंशी यांच्याकडे देण्यास सांगितले. निमगाव घाणा रोड, कर्जुने खारे येथे सूर्यवंशी यांनी तक्रारदाराकडून 10 हजार रुपये स्वीकारताच थकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news