Pathardi Teacher Job Fraud: पाथर्डीत शिक्षक नोकरीच्या आमिषाने 13.5 लाखांची फसवणूक

बनावट नियुक्ती आदेश देऊन दाम्पत्याची लूट; आरोपींवर गुन्हा दाखल
Job Fraud
Job FraudPudhari
Published on
Updated on

पाथर्डी: शिक्षक म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दाम्पत्याची तब्बल 13 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रूपेशकुमार राम बागडे (वय 39, रा. शिक्षक कॉलनी, पाथर्डी) यांनी फिर्याद दिली आहे.

Job Fraud
Shrisant Nagebaba Multistate Election: श्रीसंत नागेबाबा मल्टिस्टेट निवडणूक जाहीर; कडूभाऊ काळेंना धक्का

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांचा भाऊ किरण बागडे याचा मित्र सुभाष माणिक खेडकर (रा. मालेवाडी, ता. पाथर्डी, सध्या पिसादेवी, छत्रपती संभाजीनगर) याने सन 2022 मध्ये त्यांच्याशी संपर्क साधून जालना येथील संत कबीर विद्यालयाशी संलग्न असलेल्या सांची प्राथमिक विद्यालय, चेतनानगर येथे शिक्षक पदाच्या जागा असल्याचे सांगितले.

Job Fraud
Ashok Kharat: समता पतसंस्थेवर ईडीची धाड; बनावट खात्यांतून 60 कोटींचे व्यवहार उघड

या जागांवर नियुक्ती करून देण्यासाठी प्रत्येकी 15 लाख रुपये, अशा एकूण 30 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर खेडकर याने संस्थाचालक लिंबराज रामचंद्र जाधव (रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्याशी भेट घडवून आणली. दोघांनी मिळून नोकरी निश्चित असल्याचे सांगून विश्वास संपादन केला.

Job Fraud
Shrigonda Water Conservation: श्रीगोंद्यात तलाव गाळमुक्ती उपक्रमाला सुरुवात

यानंतर रूपेशकुमार राम बागडे यांनी वेळोवेळी रोख, आरटीजीएस आणि ऑनलाईन व्यवहाराद्वारे एकूण 18 लाख 50 हजार रुपये दिले. तसेच दोघांना बनावट नियुक्ती आदेशही देण्यात आले. त्या आधारे रूपेशकुमार बागडे व त्यांच्या पत्नीने काही काळ शाळेत कामही केले.

मात्र, त्यांना पगार मिळाला नाही. दरम्यान, चौकशी केली असता संबंधित संस्थेची मान्यता शासनाने रद्द केल्याचे समोर आले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादींनी पैसे परत मागितले. त्यावेळी आरोपींकडून टाळाटाळ करण्यात आली.

Job Fraud
Kopargaon Road Condition: कोपरगावात 7 कोटींचा रस्ता खचला; नागरिकांचा संताप

आतापर्यंत आरोपींकडून 5 लाख रुपये परत मिळाले असून उर्वरित 13 लाख 50 हजार रुपये देण्यास नकार देत फोनही उचलत नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी सुभाष खेडकर व लिंबराज जाधव यांच्याविरोधात संगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा पाथर्डी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विलास जाधव करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news