Shekte Gram Panchayat: शेकटे ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरण; गटविकास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका; पंचायत समितीच्या ढिसाळ कारभारामुळे प्रशासन अडचणीत
Gram Panchayat
Gram PanchayatPudhari
Published on
Updated on

पाथर्डी: शेकटे ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार, मासिक सभा व ग्रामसभा न घेणे, तसेच सदस्य व सरपंच अपात्रतेबाबतच्या तक्रारींकडे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी वेळेत दखल न घेतल्याने प्रशासन अडचणीत आले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ यांनी पाथर्डी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी संगीता पालवे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Gram Panchayat
Ujani Dam Pollution: उजनी धरणात जलपर्णीचा विळखा; मच्छिमारांच्या उपजीविकेला धोका

शेकटे ग्रामपंचायतीच्या मासिक सभा व ग्रामसभा न झाल्याबाबत सोमनाथ घुले व जालिंदर फुंदे यांनी नोव्हेंबर 2023मध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र, पंचायत समिती स्तरावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. पुढे जिल्हा परिषदेकडे तक्रार गेल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली. त्यानंतर काही सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले होते.

Gram Panchayat
Ahilyanagar Black Film Vehicle Action: अहिल्यानगरमध्ये ब्लॅक फिल्मविरोधात मोठी कारवाई; 458 वाहनांवर दंड

मात्र, अपिलामध्ये सदस्यांच्या सह्या बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद भंडारी यांनी 17 नोव्हेंबर 2025 रोजी संबंधित सदस्यांचे सदस्यत्व कायम ठेवण्याचा आदेश दिला. हा आदेश अद्यापही पंचायत समितीने सर्व सदस्यांना वितरित न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Gram Panchayat
Ahilyangar Seena Irrigation Project: सीना मध्यम प्रकल्पातून रब्बीसाठी पाणी; आवर्तन 23 दिवसांचे

याबाबत वारंवार सूचना देऊनही गटविकास अधिकाऱ्यांनी आदेशाची अंमलबजावणी न केल्याने प्रशासनातील दिरंगाई समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर 26 जानेवारी रोजी शेकटे ग्रामस्थांनी पंचायत समितीसमोर आंदोलन केले.

दरम्यान, सरपंच सुनीता घुले यांना अपात्र ठरविण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला असून, ग्रामपंचायतीची मुदत संपण्याच्या उंबरठ्यावर असल्याने लवकरच प्रशासक नेमण्याची शक्यता आहे.

Gram Panchayat
Shrirampur Single Women Survey: श्रीरामपूर तालुक्यात 11 हजारांहून अधिक एकल महिलांची नोंद

तक्रारी असूनही कारवाई का नाही?

शेकटे ग्रामपंचायत हा पंचायत समितीच्या ढिसाळ कारभाराचा नमुना असल्याची ग्रामस्थांची टीका आहे. तक्रारी असूनही कारवाई का झाली नाही, याचा जाब जबाबदार अधिकाऱ्यांकडून घेण्याची मागणी करत ग्रामस्थ थेट नाशिक विभागीय आयुक्तांकडे गेले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news