Black Film
Black FilmPudhari

Ahilyanagar Black Film Vehicle Action: अहिल्यानगरमध्ये ब्लॅक फिल्मविरोधात मोठी कारवाई; 458 वाहनांवर दंड

संयुक्त तपासणी मोहिमेत 2,021 वाहनांची तपासणी; 6.46 लाख रुपयांचा दंड, काचा काढून टाकल्या
Published on

नगर: प्रादेशिक परिवहन विभागाने पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने वाहनांच्या विंडस्क्रीन व खिडक्यांच्या काचांवर बेकायदेशीरपणे लावण्यात येणाऱ्या ‌’ब्लॅक फिल्म‌’ विरोधात जिल्ह्यात विशेष संयुक्त तपासणी मोहीम राबवली.

Black Film
Ahilyangar Seena Irrigation Project: सीना मध्यम प्रकल्पातून रब्बीसाठी पाणी; आवर्तन 23 दिवसांचे

28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण 2 हजार 21 वाहनांची तपासणी करण्यात आली. यात दोषी आढळलेल्या 458 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, एकूण 6 लाख 46 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांनी दिली.

Black Film
Shrirampur Single Women Survey: श्रीरामपूर तालुक्यात 11 हजारांहून अधिक एकल महिलांची नोंद

या मोहिमेत अहिल्यानगर प्रादेशिक परिवहन कार्यालय व श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत कार्यरत सर्व वायुवेग पथके, तसेच जिल्ह्यातील 14 तालुका पथकांमधील मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी सहभाग घेतला. या पथकांनी एकूण 2021 वाहनांची कसून तपासणी केली. तपासणीदरम्यान ज्या 458 वाहनांवर बेकायदेशीर ब्लॅक फिल्म आढळल्या, त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. आकारण्यात आलेल्या 6 लाख 46 हजार रुपये दंडापैकी 37 हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

Black Film
Shrirampur Municipal Council: श्रीरामपूर नगरपालिकेचा ऐतिहासिक निर्णय; संभाजी महाराजांचा पुतळा सभागृहासमोर

तसेच संबंधित वाहनांवरील ब्लॅक फिल्म्स काढून टाकण्यात आल्या आहेत.या विशेष मोहिमेत ब्लॅक फिल्म व्यतिरिक्त इतर बाबींचीही पडताळणी करण्यात आली. यात वैध विमा नसलेली वाहने, नोंदणी प्रमाणपत्र किंवा वाहन परवाना नसणे, वाहन चालवण्याचा परवाना नसणे, वाहनांतील दिव्यांमधील त्रुटी व वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Black Film
Ahilyanagar Sugar Mills: अहिल्यानगरमध्ये साखर गाळपाला वेग; एक कोटी टनांचा टप्पा पार

जिल्ह्यातील वाहन मालक व चालकांनी मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार वाहनांची समोरील (दर्शनी) काच व खिडक्यांच्या काचांवर ब्लॅक फिल्म बसवू नये. कायद्यातील अटी व शर्तींचे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सहकार्य करावे.

विनोद सगरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news