Pathardi Police Raid Prostitution: पाथर्डीत लॉजवर पोलिसांचा छापा; वेश्या व्यवसाय प्रकरणी एक अटक, मुख्य आरोपी फरार

टाकळी फाट्यावर कारवाई; चार महिलांना ताब्यात, सहा महिन्यांनंतर पुन्हा उघड झाला प्रकार
Prostitution
ProstitutionPudhari
Published on
Updated on

पाथर्डी: तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी फाट्यावर अक्षय लॉजवरील वेश्या व्यवसायावर पाथर्डी पोलिसांनी मंगळवारी (दि.17) मध्यरात्री छापा टाकत चार महिलांना ताब्यात घेतले. या प्रकरणातील मुख्य आरोपी श्रीराम राधाकिसन फुंदे (रा. फुंदे टाकळी) हा अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला असून, व्यवस्थापक दीपक पोपट बटुळे (रा. भारजवाडी) याला पोलिसांनी अटक केली.

Prostitution
Ahilyanagar Municipal Budget: अहिल्यानगर मनपा बजेटवरून खळबळ; पाणीपट्टी 25% कमी करण्याची मागणी

पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप ढाकणे व पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दोन वाहनांतून घटनास्थळी जाऊन सापळा रचला. पोलिस कर्मचारी संजय जाधव यांना बनावट ग्राहक म्हणून एक हजार रुपये देऊन संबंधित ठिकाणी पाठविण्यात आले.

Prostitution
Kanifnath Yatra 2026: मढीतील कानिफनाथ यात्रेत जलाभिषेक; फुलोरबाग सोहळा उत्साहात

व्यवस्थापकाने पैसे स्वीकारून एका महिलेला जाधव यांच्यासोबत खोलीत पाठविल्यानंतर संपूर्ण प्रकाराची खात्री पटली. यानंतर जाधव यांनी वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर पोलिस पथकाने तत्काळ ठिकाणाला वेढा घालत छापा टाकला.

Prostitution
Rahuri Bypoll Election: राहुरी पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; 374 केंद्रांवर वेबकास्टिंग

या कारवाईदरम्यान चार महिलांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, मुख्य आरोपी श्रीराम फुंदे निसटण्यात यशस्वी झाला. महिला पोलीस कर्मचारी उत्कर्षा वडते यांच्या फिर्यादीवरून श्रीराम फुंदे व दीपक बटुळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Prostitution
Sangamner Acid Attack: संगमनेरमध्ये विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला; तपासासाठी पोलिसांना विखेंच्या सूचना

दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी याच ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून सुमारे 20 महिलांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर काही काळ बंद असलेला हा व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news