Sangamner Acid Attack: संगमनेरमध्ये विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला; तपासासाठी पोलिसांना विखेंच्या सूचना

वडगाव पान येथे संतापजनक प्रकार; 12 वर्षीय मुलगी गंभीर जखमी, पोलिसांचा शोध सुरू
Acid Attack
Acid AttackPudhari
Published on
Updated on

संगमनेर: शाळा सुटल्यानंतर घरी जात असलेल्या बारा वर्षांच्या विद्यार्थिनीवर दुचाकीवरून आलेल्या माथेफिरूने ॲसिड फेकल्याची संतापजनक घटना तालुक्यातील वडगाव पान येथे मंगळवारी दुपारी घडली. ॲसिड चेहऱ्यावर पडल्याने मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने लोणी येथे प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Acid Attack
Karanji School Kitchen Garden: करंजीतील शाळेत परसबाग उपक्रम; विद्यार्थ्यांना शेतीचे धडे

दरम्यान, या प्रकाराबाबत सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असून, ॲसिड हल्ला करणाऱ्या माथेफिरूचा पोलिस शोध घेत आहेत. घटनास्थळाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने आजूबाजूच्या परिसरातील कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असल्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी सांगितले.

वडगाव पान शिवारात मंगळवारी (दि.17) एका शाळेतील बारा वर्षांची विद्यार्थिनी दुपारी बारा वाजता शाळा सुटल्यानंतर अन्य विद्यार्थ्यांसमवेत घरी जात होती. त्या वेळी रस्त्यात दुचाकीसह थांबलेल्या तरुणाने ती विद्यार्थिनी जवळ येताच तिच्यावर ॲसिड फेकले. ते चेहऱ्यावर व अंगावर पडल्याने मुलगी गंभीर जखमी झाली. तिने आरडाओरडा केला. इतर विद्यार्थी आणि नागरिकांनी लगेच तिकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत ॲसिड फेकणारा तरुण दुचाकीवरून पसार झाला. नागरिकांनी तातडीने तिला लोणी येथे प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेले.

Acid Attack
Nevasa Unseasonal Rain: नेवासात अवकाळी पावसाचा धोका; कांदा-गहू उत्पादक चिंतेत

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, निरीक्षक साळुंखे यांच्यासह मोठा फौजफाटा दाखल होऊन माथेफिरूचा शोध सुरू करण्यात आला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

ॲसिड हल्ल्यात जखमी झालेली विद्यार्थिनी गरीब कुटुंबातील असून ती नातेवाइकाकडे राहून शिक्षण घेत होती. रात्री उशिरा तिच्या नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तरुणाविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील रणखांब येथे सोमवारी एका युवतीवर चाकूहल्ल्यानंतर मंगळवारी ॲसिड हल्ल्याची घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे.

Acid Attack
Bhenda Water Crisis: भेंडा परिसरात पाणीटंचाई; पिके धोक्यात

तपासाबाबत पालकमंत्री विखे यांच्या सूचना

शालेय विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर असून पोलिसांना याबाबत तपासाच्या सूचना दिल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. या घटनेची गंभीर दखल घेऊन विद्यार्थिनीवर सर्वतोपरी उपचार करण्याच्या सूचना प्रवरा ग्रामीण रुग्णालयाला दिल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांनाही तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या भागात घटना घडली, तेथे सीसीटीव्ही व्यवस्था नाही. तरीही पोलिसांनी विशेष पथक नेमून तपास करावा, असे निर्देश दिल्याचे ते म्हणाले. शासनाच्या वतीने विद्यार्थिनीला मदत मिळवून देण्याची ग्वाहीही मंत्री विखे पाटील यांनी दिली.

Acid Attack
Jamkhed Law And Order: जामखेडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न; गस्त वाढवण्याची मागणी

आ. खताळ यांनी वेधले विधानसभेेचे लक्ष

दरम्यान आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत या घटनेचा विषय उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. यावर महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घेतली असून या विद्यार्थिनीला सर्व मदत करण्याची ग्वाही सभागृहात दिली.

थोरातांकडून निषेध; तांबे यांची भेट

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या घटनेचा निषेध केला असून या वियार्थिनीला तातडीने मदत करण्याच्या सूचना अमृत उद्योग समूहाच्या यंत्रणेला दिल्या. युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, तसेच माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी रुग्णालयात जाऊन मुलीची भेट घेऊन नातेवाइकांना आधार दिला. आरोपीला शोधून कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news