Ahilyanagar Politics: मोदी सरकारकडून भारताची सर्वांगीण प्रगती; भाजप जिल्हाध्यक्षांची माहिती

‘स्थानिक’ला स्वबळ की महायुती याचा निर्णय आमदारच घेणार
Ahilyanagar Politics
मोदी सरकारकडून भारताची सर्वांगीण प्रगती; भाजप जिल्हाध्यक्षांची माहितीPudhari
Published on
Updated on

नगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकसित भारताच्या अमृतकाळात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची नवी यात्रा सुरु केली असून, यामुळे प्रत्येक योजनेने जनकल्याणच झाले आहे. या सरकारने देशाच्या सीमा मजबूत करीत अर्थव्यवस्था मजबूत केली.

पंतप्रधान मोदींनी विकसनशील भारतास विकसित भारत बनवत सर्वांगीण प्रगती साधली असल्याची माहिती भाजपचे अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग व उत्तर जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी दिली.  (Latest Ahilyanagar News)

Ahilyanagar Politics
Ahilyanagar: जिल्ह्यात 863 हेक्टरवरील पिके, फळबागा मातीमोल

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर की महायुतीत लढविण्याबाबतचा अंतिम निर्णय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्ह्यातील भाजपचे आमदार घेणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.

मोदी सरकारला नुकतेच अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत. या कालावधीत युपीए सरकारच्या माध्यमातून झालेला विकास व प्रगतीची माहिती देण्यासाठी सोमवारी जिल्हा भाजपतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

प्रारंभी शहर जिल्हाध्यक्ष मोहिते यांनी अकरा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील जनतेसाठी घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण 71 निर्णयाचे वाचन केले. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत 81 कोटींपेक्षा अधिक लाभार्थ्यांना मोफत रेशन दिले जात आहे. जिल्ह्यात ही योजना सुरु असल्याचे सांगितले.

पंतप्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 4 कोटींपेक्षा अधिक घरे बांधली आहेत. पंधरा कोटींपेक्षा अधिक घरांना हर घर जलयोजनेच्या माध्यमातून नळ जोडणी केली आहे. पीकविमा योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सहा हजार रुपये वार्षिक मदत केली जात आहे. देशात 23 एम्स आणि 2 हजारांपेक्षा अधिक वैद्यकिय महाविद्यालये सुरु केले आहेत.

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 55 कोटींपेक्षा अधिक नागरिकांना 5 लाखांचे वार्षिक मोफत उपचार दिले जात आहेत. कलम 370 आणि 35 अ हटवण्यापासून ते नॅशनल डिफेन्स अकॅडमीत पहिल्यांदाच महिलांना प्रवेश देण्याचा निर्णयापर्यंत 71 महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन देशातील सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्याचा निर्णय घेतल्याचे मोहिते यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांच्या कार्याचा गौरव करून देशात त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व क्षेत्रात मोठी प्रगती होत असल्याचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी सांगितले. नितीन दिनकर म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने लाखो नागरिकांनी योजनांचा लाभ घेतल्याचे सांगितले.

Ahilyanagar Politics
Ahilyanagar: बळीराजाच्या डोक्यावर 8300 कोटींचे पीककर्ज

या वेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अशोक गायकवाड, महेश नामदे, सविता कोटा, केडगाव मंडलाध्यक्ष भरत ठुबे, भिंगार मंडलाध्यक्ष सचिन जाधव, मध्य मंडलाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, बाळासाहेब भुजबळ, दादा दरेकर, महेश लांडगे, सचिन ठोकळ, विद्या शिंदे, संदीप परभणे, सचिन कुसळकर आदी उपस्थित होते.

दोन तृतीयांशपेक्षा अधिक जागांवर लक्ष्य

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या दोन तृतीयांशपेक्षा अधिक जागा निवडून आणण्यावर भाजपचे लक्ष आहे. या निवडणुकीत स्वबळावर की महायुतीतून लढविण्याबाबतचा स्थानिक पदाधिकारी जो निर्णय घेतील, त्या निर्णयास प्रदेश भाजप समिती मान्यता देणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष मोहिते यांनी सांगितले.

मात्र याबाबत पालकमंत्री विखे पाटील आणि भाजपचे आमदार अंतिम निर्णय घेणार आहेत. नवीन वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरात होणार आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय देखील शहरात सुरु केले जाणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

सुपा एमआयडीसीतील दहशत हा भूतकाळ

नगरच्या विस्तारित एमआयडीसीत जमीन हस्तांतरणात अडचणी होत्या. त्या दूर झाल्या आहेत. अकरा वर्षांपूर्वी या एमआयडीसीची दुरास्था होती. ती आता दूर झाली आहे. या ठिकाणी संरक्षण विभागाची उत्पादने करणारे प्रकल्प होऊ घातले आहेत.

एकंदरीत कंपन्यांची गुंतवणूक वाढणार आहे. त्यामुळे छोट्या व्यासायिकांना कामांची संधी मिळणार आहे. या ठिकाणी मोठ्या प्रकल्पांकडे जागा पडून आहेत. अशा जागा हस्तांतरीत करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

सुपा एमआयडीसमध्ये उद्योजकांना त्रास दिला जात असल्याचे बोलले जात आहे. उद्योजकांसाठी तो भुतकाळ होता. आता तेथील दहशत संपली आहे. यापुढे उद्योजकांना त्रास होणार नाही, याची दक्षता पालकमंत्री विखे पाटील यांनी घेतली असल्याचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news