

शिर्डी: शिर्डीतील स्थानिकांच्या श्री साई समाधी दर्शनासाठी स्वतंत्र गावकरी लाईन सुरू करण्यास संसथान सकारात्मक असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. गावकर्यांच्या विविध मागण्याबाबत संस्थान सहानुभूतीपूर्वक विचार करेल, असे आश्वासनही गाडीकल यांनी दिल्याची माहिती हाती आली आहे.
साईबाबा समाधी दर्शनासाठी शिर्डीतील स्थानिक ग्रामस्थांना येणार्या अडचणी तसेच साईबाबा संस्थानमध्ये वाढती कुलुप संस्कृती आणि सुरक्षा रक्षकांकडून होणारी अडवणूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष कैलास कोते, कमलाकर कोते, सुधाकर शिंदे, विलास गोंदकर, संदीप सोनवणे, राजेंद्र गोंदकर, तानाजी गोंदकर, निलेश कोते, दिपक वारुळे यांच्या उपस्थित बैठक झाली. त्यानंतर साईबाबा संस्थानच्या सभागृहात बैठक झाली. (Latest Ahilyanagar News)
संस्थानच्या कुलूप संस्कृतीला गावकर्यांचा विरोध असून ग्रामस्थ व त्यांच्या नातेवाईकांना दर्शनासाठी अडवणूक होणार नाही, याची काळजी साईबाबाच संस्थांनने घेतली पाहिजे अशी मागणी कैलासबापू कोते यांनी केली.
त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शिर्डी गावकर्यांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून समाधी दर्शनासाठी गावकर्यांकरीता स्वतंत्र लाईन सुरू केली जाणार असल्याचे सांगितले.
गावकर्यांसोबत असलेल्या नातेवाईकांच्या दर्शनासाठी अडचण येणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.ताराचंद कोते, विजय जगताप, मनिलाल पटेल, अरविंद कोते, अजित पारख, मंगेश त्रिभुवन, निलेश कोते, सर्जेराव कोते, निलेश पाराजी कोते यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी नात्याने नेहमीच शिर्डी ग्रामस्थांशी विविध विषयावर चर्चा करत असतो. शिर्डीत साईभक्त वाढले पाहिजे, हा संस्थांचा प्रयत्न आहे. गावकर्यांच्या विविध मागण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. दर्शनासाठी स्वतंत्र गावकरी लाईन सुरू केले जाईल.
- गोरक्ष गाडीलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी