

Now night Shani Darshan is closed; Decision taken in a meeting of temple trustees and villagers for security reasons
नेवासा/सोनई: पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील तीर्थक्षेत्र शनिशिंगणापुरातील शेकडो वर्षांपासून भाविकांसाठी २४ तास खुले असणारे शनी मंदिर आता शनैश्वर देवस्थान शिंगणापूर येथे २७ मे रोजी झालेल्या विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ यांच्या झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार दि. ११पासून स्वच्छता व सुरक्षेच्या कारणास्तव रात्री १०:३० ते ४ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे देवस्थानतर्फे सांगण्यात आले आहे. रात्री शनी मंदिर बंद ठेवण्यात येणार असले, तरी शनी अमावस्या, गुढीपाडवा, शनी जयंती आदी दिवशी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले राहणार आहे.
राज्यभरातील वेगवेगळी देवस्थाने रात्री बंद असताना एकमेव तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथील शनी मंदिर शतकाहून अधिक काळापासून अहोरात्र खुले राहत होते. येथील चौथन्यावर शनि महाराजांबी मूर्ती ऊन, वारा, पाऊस या तीनही ऋतूंत साक्षात उभी आहे. देव आहे पण देऊळ नाही.. वृक्ष आहे पण छाया नाही.. अशा आगळ्यावेगळ्या शनी मंदिराची महती संपूर्ण हिंदुस्तानात पसरली आहे. विशेष म्हणजे येथील घरांना दरवाजा नाही. कडी कोयंड्याचा आपर होत नाही हे एक आचर्य मानले गेले आहे.
२४ तास खुल्या असणाऱ्या मंदिरामुळे येथील देवस्थान प्रशासनावर सुरक्षा राखण्यासाठी ताण पडतो. सुरक्षा कर्मचारी संख्या वाढवावी लागते. शिवाय कमिशन एजंटाचा उच्छाद लक्षात घेता भाविकांच्या होणाऱ्या लुटीमुळे येथील कायदा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता रात्री साडेदहा ते पहाटे चार या कालावधीत साडेपाच तास रात्रभर मंदिर बंद ठेवण्याच्या हालचाली देवस्थानकडून होत आहे. मागील दोन वर्षांपूर्वीच रात्री मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, हा विषय लांबणीवर टाकला गेला.
आता देवस्थानच्या हालचाली पाहता दि. ११पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार का? हे प्रत्यक्षात पहावे लागेल. रात्री मंदिर बंद झाल्यास लांबून आलेल्या घाविकांना येथील भक्तनिवास उपलब्ध असून, किमान ७०० ते ८०० भाविक दररोज थांचू शकतात, अशी व्यवस्था असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवाय मंदिर परिसरात खासगी इंटिल, लॉज उपलब्ध असून, मंदिर बंद केल्यास स्थानिक रोजगार वाचेल, असाही कयास बांधला जात आहे.
तालुक्यातील शनिशिंगणापूर बेधोल बनावट अॅपबाबत गेल्या १५ दिवसांपासून विविध उलट सुलट चर्चा होत असल्याने याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी अनेकांनी केली आहे. तसेच देवस्थानच्या विविध विभागात अनेक वर्षांपासून कर्मचारी एकाच ठिकाणी काम करत आहे. त्यामुळेच त्यांची मक्तेदारी झाली असल्याचे बोलले जात आहे. ग्रामस्थ व विश्वस्तांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत काही ग्रामस्थांनी आवाज उठविला होता. याबाबत विश्वस्त व प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन बदल्या कराव्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शनि मंदिरात मागील वर्षी ६० कोटी खर्चन उभारण्यात आलेल्या पानस तीर्थ प्रकल्प भाविकांसाठी खुला झाला असून, भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता महाद्वार, भुयारी मार्ग उभारले गेले. येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकाला एकाच गेटमधून प्रवेश असून, दुसऱ्या बाजूला व्हीआयपी मार्ग उभारला आहे. येथील गावकऱ्यांना शनी दर्शन घेण्यासाठी भुयारी मार्गातून वळसा घालून मंदिरात जावे लागते, या वेळी स्थानिकांना कष्ट उपसावे लागतात, अशी भावना निर्माण झाली असून, भाविकांना स्वतंत्र मार्ग करण्यासाठी येथील ग्रामसभेत व वेळोवेळी मीटिंगमध्ये गावकरी गेट करण्याची मागणी सातत्याने होत गेली, त्यानुसार गावकरी गेट उभारले जाणार असून, या गेटमधून केवळ गावकरीच आधार कार्ड दाखवून शनी मंदिरात प्रवेश करणार आहेत.