Nitesh Rane News: फडणवीस-शिंदे ही ‘राम-लखन’ची जोडी - मंत्री नितेश राणे

कदम यांच्या वक्तव्याबाबत उपमुख्‍यंमत्री शिंदे यांनी त्‍यांची भूमिका स्‍पष्‍ट करावी अशी मागणी राणे यांनी केली.
Nitesh Rane
Nitesh Rane pudhari photo
Published on: 
Updated on: 

नगर: शिवसेनेचे सर्वेसर्वा उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपवर तसेच मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍यावर कधीही टीका करीत नाहीत. रामदास कदम सध्‍या जे काही बोलतात ते स्‍वत: बोलतात की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संमतीने वक्‍तव्‍य करतात. असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी उपस्‍थित केला. कदम यांच्या वक्तव्याबाबत उपमुख्‍यंमत्री शिंदे यांनी त्‍यांची भूमिका स्‍पष्‍ट करावी अशी मागणी राणे यांनी केली.

Nitesh Rane
Akshay Kardile: आमदार कर्डिले यांच्या निवडीचे स्वागत; आमदार स्व. कर्डिले यांच्या राजकीय वाटचालीची आठवण

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रसारित केलेल्या ऑडिओ क्लिपवरुन शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपावर निशाणा साधला याकडे मंत्री राणे यांचे लक्ष वेधले असता ते आक्रमकपणे बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्‍ही महायुतीमधील ‘राम-लखन’ची जोडी असून या जोडीनेच उद्धव सरकाररुपी रावण जाळला.

Nitesh Rane
Ahilyanagar Jal Jeevan Mission: ‘जलजीवन’ची कामे अपूर्ण; ठेकेदार रडारवर

ते पुढे म्‍हणाले की, महाविकास आघाडीमध्‍ये एकनाथ शिंदे यांची काय परिस्‍थिती होती. हे कदम यांना माहित आहे का, ते शिंदे यांना संपावला निघाले होते. त्‍यावेळी भाजपने त्‍यांना साथ दिली. ताकद दिली. मुख्‍यमंत्रीपददेखील दिले. त्‍यामुळेच राज्‍यात हिंदुत्‍ववादी सरकार आले असून, राज्‍यभर सर्वत्र भगवे झेंडे दिसत आहेत. असे मंत्री राणे यांनी कदम यांचे नाव न घेता त्‍यांना सुनावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news