Nevasa Illegal Mineral Mining Action: नेवाशात अवैध मुरूम उत्खननावर महसूल पथकाची धडक कारवाई

चांदा-लोहारवाडी शिवारात जेसीबी व डंपर जप्त; स्थानिक यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्न
Illegal Mineral Mining Action
Illegal Mineral Mining ActionPudhari
Published on
Updated on

नेवासा: महसूल विभागाच्या पथकाने तालुक्यातील चांदा -लोहारवाडी शिवारात होत असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात शनिवारी पहाटे धडक कारवाई करीत एक जेसीबी सह एक डंपर ताब्यात घेतले. महसूल पथकाच्या कारवाईची चाहूल लागताच इतर ट्रॅक्टर व डंपरने मुरूमासह स्पॉटवरून पोबारा केला. दरम्यान, चांदा व परिसरात कोट्यवधी रुपयांचा हजारो ब्रास मुरुमाचे उत्खनन झाल्याचे आढळून आले.

Illegal Mineral Mining Action
Jeur Daytime Electricity Farmers Demand: बिबट प्रवण जेऊर परिसरात शेतकऱ्यांची दिवसा वीज देण्याची मागणी

तालुक्यातील चांदा शिवारात सर्रास होत असलेल्या अवैध मुरूम तस्करी बाबतचे फोटो, व्हिडिओ नेवाशाचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांना गुप्त माहितीदाराकडून मिळाली. त्याची गांभीर्याने दखल घेत पाटील यांनी तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांना कारवाईचे आदेश दिले. तहसीलदारांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून अवैध मुरूम उत्खनन करणारे एक जेसीबीसह एक डंपर ताब्यात घेतले.

Illegal Mineral Mining Action
Ahilyanagar ZP Employee Society Election: अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय कडूस

जिल्हाधिकारी पंकज आशिया, अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेश हिंगे व उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे, सोनई मंडलाधिकारी प्रशांत कांबळे, वडाळा मंडलाधिकारी फिरोज सय्यद, नेवासा मंडलाधिकारी अनिल गव्हाणे, तलाठी गडकर, भावसार, कोतवाल योगेश मिसाळ, अमोल शिंदे, संदीप शिरसाठ, संतोष महाडिक यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Illegal Mineral Mining Action
Ajit Pawar Demise: अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा: विवेक कोल्हे

स्थानिक महसूल यंत्रणा करते काय?

जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांना अवैध गौणखानिज तस्करीचे व्हिडिओ-फोटो जातात. त्यानंतर कारवाई होते. मात्र, चांदा येथील स्थानिक महसूल यंत्रणा काय करते. त्यांनी या मुरूम तस्करीचे का कारवाई केली नाही. या बरोबरच जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार या प्रकरणी त्यांच्यावर काय कारवाई करणार? असे अनेक प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित होत आहेत.

Illegal Mineral Mining Action
Radhakrishna Vikhe Patil Development: विकासासोबत रोजगारनिर्मितीला प्राधान्य: मंत्री विखे पाटील

संबंधित कारवाईत एक जेसीबी व डंपर ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित मंडळाधिकारी व तलाठ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यांनतर पुढील कारवाई करण्यात येईल.

डॉ. संजय बिरादार, तहसीलदार, नेवासा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news