

पारनेर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक मजबुतीसाठी पदाधिकार्यांच्या निवडी महत्त्वाच्या असून, नवीन जबाबदारी पार पाडताना सर्वांनी प्रामाणिकपणे पक्षाच्या धोरणांशी एकनिष्ठ राहून कार्य करावे, असे आवाहन आमदार काशिनाथ दाते यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बळकटीसाठी पारनेर तालुक्यातील विविध पदाधिकार्यांच्या नव्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. आमदार दाते यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले. (Latest Ahilyanagar News)
पक्षाच्या विचारधारेवर निष्ठा ठेवत कार्य करणार्या नवनियुक्त पदाधिकार्यांमध्ये प्रवीण बोरगे यांची सामाजिक न्याय संघटकपदी, किरण रासकर यांची ओबीसी सेल उपाध्यक्षपदी, राजेश सावंत यांची संघटकपदी निवड करण्यात आली आहे.
या नियुक्त्यांमुळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अधिक भक्कम होणार असून, पक्षकार्य अधिक गतिमान व परिणामकारक होईल, असा विश्वास यावेळी पदाधिकार्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, युवा तालुकाध्यक्ष भास्कर उचाळे, जिल्हा सरचिटणीस नितीन म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष आर.एस. कापसे, जिल्हा महिला कार्याध्यक्षा सुधामती कवाद, तालुका महिला अध्यक्षा सुषमा रावडे, महिला युवती तालुकाध्यक्षा अपर्णा खामकर, सोनाबाई चौधरी, तालुका उपाध्यक्ष संतोष सालके, विठ्ठल कवाद, बाळासाहेब लामखडे, युवक उपाध्यक्ष शिवराज कदम, रमेश वरखडे, रोहिदास लामखडे आदी उपस्थित होते.
नवनिर्वाचित पदाधिकारी आमदार दाते सरांच्या नेतृत्वाखाली पक्षाची विचारधारा तळागाळात पोहोचविण्यासाठी उत्तम कामगिरी बजावतील, असा विश्वास असून त्यांच्या माध्यमातून समाजातील जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लागावेत, हीच अपेक्षा.
- अशोक सावंत, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेर्सी, नगर
आमदार काशिनाथ दाते सरांच्या विधानसभेतील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे तरुणांचा ओढा वाढला असून यापुढील काळात आम्ही सर्व सहकारी या सर्व तरुणांच्या माध्यमातून एक मजबूत व वैचारिक विचारांच्या कार्यकर्त्यांची फळी आमदार दाते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी करणार आहोत.
- भास्कर उचाळे, तालुकाध्यक्ष, युवा राष्ट्रवादी काँग्रेस