Ashok Kharat: भोंदूबाबा प्रकरणात नवा खुलासा; 'कॅप्टन'ची धडपड पेनड्राईव्हसाठी.. खोट्या तक्रारीच्या तपासात असा झाला भांडाफोड

Captain ashok kharat Ahilyanagar Case: पेनड्राईव्हमधील धक्कादायक माहिती, अटकेआधी पळून जाण्याची तयारी उघड
Ashok Kharat Nashik
Ashok Kharat NashikPudhari
Published on
Updated on

mahila ayog involvement in Captain ashok kharat Case

गोरक्ष शेजूळ

नगर: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याला वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केल्याची आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहिल्यानगर पोलिसांनी ‌‘पोलखोल‌’ सुरू केल्याची माहिती समोर येताच महिला आयोगाने नगरच्या अपर पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावली. या अधिकाऱ्याची महिला आयोगासमोर सुनावणी सुरू असताना, त्याच रात्री (दि.17) नाशिक पोलिसांनी खरातच्या घराला वेढा घालत त्याला बेड्या ठोकल्या. दरम्यान, खरातच्या काळ्या कारनाम्याचा तो पेनड्राईव्ह सर्वप्रथम अहिल्यानगर पोलिसांच्या हाती लागला. नगर पोलिसांनी तो नाशिक पोलिसांकडे सुपूर्द केल्यानंतर खरातचा भांडाफोड झाल्याची माहिती आता समोर येत आहे.

Ashok Kharat Nashik
Water Tax Ahilyanagar: २५ टक्के पाणीपट्टी कपात ‘दिशाभूल’; काँग्रेसकडून महापालिकेवर निशाणा

भोंदूबाबा कथित कॅप्टन अशोक खरात याचा ऑफिसबॉय नीरज जाधव याच्यावर शिर्डीत 18 फेब्रुवारी 2026 लाच दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा हा ‌‘प्री प्लॅन्‌‍ड‌’ होता. त्या तपासातूनच ‌‘खरात फाईल‌’ म्हणून बहुचर्चित झालेला ‌‘तो‌’ पेनड्राईव्ह सर्वप्रथम शिर्डी पोलिसांच्या हाती लागला. त्यात, प्रशासकीय, प्रतिष्ठित अशा महिलांचे 40 व्हिडीओ होते, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे. त्यानंतर अहिल्यानगर पोलिस नाशिकला पोहचले. तीन दिवस नगर पोलिस नाशिकमध्ये ठाण मांडून होते. याच दरम्यान अहिल्यानगर पोलिसांनी तो पेनड्राईव्ह नाशिक पोलिसांकडे सुपूर्द केल्याचेही विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

Ashok Kharat Nashik
Nilwande Irrigation Project: निळवंडे प्रकल्प अंतिम टप्प्यात; उत्तर नगर जिल्ह्याच्या शेतीला नवे जीवन

नीरज जाधवकडे अशोक खरातचे अनेक व्हिडीओ असलेला पेनड्राईव्ह होता. तो जाधवकडून मिळविण्यासाठी खरातने प्लॅन केला. त्यासाठी शिर्डीतील तरुणीची मदत घेतली. या तरुणीने नीरज जाधवच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास करत असताना ‌‘ती‌’ची फिर्यादच संशयास्पद असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी नीरज जाधवचा शोध सुरू केला; मात्र तो मिळून आला नाही. कुटुंबीयांकडे पोलिसांनी ‌‘खास‌’ निरोप देताच अनोळखी व्यक्तीमार्फत एक पेनड्राईव्ह शिर्डी पोलिसांना मिळाला. त्यात प्रतिष्ठित महिलांचे ‌‘तसले‌’ 40 व्हिडीओ दिसले. ही माहिती सरकारमधील प्रभावी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांच्याच आदेशाने दाखल गुन्ह्यात खरातला आरोपी करण्यात आले. तो पळून जाऊ नये म्हणून अहिल्यानगर पोलिसांनी 9 मार्चला लुकआऊट नोटीस जारी केली.

Ashok Kharat Nashik
Ahilyanagar Crop Damage: पुन्हा अवकाळी, पुन्हा गारपीट; नगर जिल्ह्यात ३५५९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

दरम्यान, अहिल्यानगरचे पोलिस खोलात घुसले असून त्यांच्यापासून भोंदू खरातला धोका असल्याची कुणकुण महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना लागली. महिला आयोगाने विनयभंगाच्या गुन्ह्याचा तपास करताना महिलांना त्रास दिला म्हणून श्रीरामपूरचे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना नोटीस बजावली. अर्थात खरातच्या गुन्ह्यात खोलवर तपास जाऊ नये, यासाठी हा दबावाचाच एक भाग होता. या नोटिशीनंतर अपर पोलिस अधीक्षक वाघचौरे यांची 3 मार्च आणि 17 मार्चला रूपाली चाकणकर यांच्यासमोरच सुनावणी झाली.

Ashok Kharat Nashik
Kopargaon Road Development: कोपरगावातील रस्ते-पुलांच्या कामांना वेग; गडकरींकडून तातडीच्या पूर्णत्वाची ग्वाही

मात्र पोलिस खोलवर गेले असून खरातला अटक होणार याची खात्री अहिल्यानगर पोलिसांना होती. त्यामुळे महिला आयोगाच्या नोटिशीबद्दल नगर पोलिस फार गाभीर्याने घेत नव्हते. 17 मार्चला दिवसभर अपर पोलिस अधीक्षक वाघचौरे यांची चाकणकर यांच्यासमोर सुनावणी असतानाच नगर व नाशिक पोलिसांनी संयुक्तपणे खरातच्या घराला वेढा घातला. त्याच रात्री त्याला बेड्या ठोकल्या, अशी नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ऑस्ट्रेलियात पळण्याच्या होता तयारीत

भोंदू कॅप्टन खरात यालाही गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस केव्हाही पोहचतील याची कुणकुण होती. त्यामुळे त्याने न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियात पळून जाण्याचा प्लॅन केला होता. पोलिसांना याची पूर्वकल्पना आली होतीच. त्यामुळेच पोलिसांनी 9 मार्चला खरातच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी करत त्याचे ‌‘हवाई‌’ पलायनाचे रस्ते बंद केले होते.

पूर्वतयारी शिर्डीतून

कॅप्टन अशोक खरात याचे अनेक कारनामे आता पुढे येत आहेत. त्याला नाशिक पोलिसांत दाखल गुन्ह्यात बेड्या ठोकल्या असल्या तरी त्याची पूर्वतयारी शिर्डीतून झाली. शिर्डीत दाखल गुन्ह्याच्या तपासात त्या तरुणीच्या माहितीत विसंगती आढळून आली. त्यानंतर विनयभंगाच्या पष्ठ्यर्थ ‌‘ती‌’ने शिर्डी पोलिसांकडे दिलेले ‌‘ते‌’ चित्र एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बनविल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला अन्‌‍ अहिल्यानगर पोलिस खोलात गेले. याच दरम्यान अहिल्यानगर पोलिसांना नीरज जाधवकडे असलेला पेनड्राईव्ह अज्ञाताकडून मिळाल्यानंतर सगळा भांडाफोड झाला. मात्र पोलिसांनी अत्यंत गोपनीयरित्या हाल‌‘चाली‌’ केल्या. त्याचा थांगपत्ताही खरातला लागला नाही.

शिर्डीतील महिलांही भुलल्या...

शिर्डी परिसरातील अनेक प्रतिष्ठित महिला भोंदू खरातच्या जाळ्यात अडकल्या आहेत. मात्र बदनामीपोटी त्या पुढे आल्या नाहीत. मात्र अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी वेळीच गुन्ह्याचे गांभीर्य ओळखले आणि ते एका प्रभावी मंत्र्याच्या निदर्शनासही आणून दिले. त्यानंतर खरातही आरोपीच्या यादीत आला आणि त्याच्या अटकेच्या दृष्टीने तयारी सुरू झाली. नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला असला तरी खरातचा खरा भांडाफोड हा अहिल्यानगर पोलिसांनीच केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

शिर्डीतील ‌‘ती‌’च्याशी खरातचे संगनमत?

शिर्डीत दाखल विनयभंगाची तक्रार ‌‘फेक‌’ असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. नीरज जाधवकडे असलेला ‌‘तो‌’ पेनड्राईव्ह मिळविण्यासाठी खरातने शिर्डीतील ‌‘ती‌’ला हाताशी धरले. जाधव त्याच पेनड्राईव्हच्या माध्यमातून खरातला ब्लॅकमेल करत होता. त्यामुळे खरात व ‌‘ती‌’ने संगनमताने फिर्याद दाखल केल्याचे तपासात समोर आले. मात्र त्यात भोंदू खरातच अडकला. दरम्यान, शिर्डीतील ‌‘ती‌’च्याच माध्यमातून शिर्डीतील काही प्रतिष्ठित महिला खरातच्या वासनेच्या शिकार झाल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news