Nagar Manmad Highway Diesel Theft Gang: नगर-मनमाड महामार्गावर डिझेल चोरी टोळीचा पर्दाफाश; चार जणांना अटक

एलसीबीची सिनेस्टाईल कारवाई; पाठलाग करून चार आरोपी जेरबंद, एक फरार
Highway Diesel Theft Gang
Highway Diesel Theft GangPudhari
Published on
Updated on

राहुरी: नगर-मनमाड महामार्गावर रात्रीच्या वेळी उभ्या वाहनांमधून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने अखेर पर्दाफाश केला. एलसीबीच्या पथकाने रविवारी मध्यरात्री सिनेस्टाईल पाठलाग करत राहुरी तालुक्यातील गुहा परिसरातून चार जणांना जेरबंद केले.

Highway Diesel Theft Gang
Shabdagandha Sahitya Sammelan 2026: अहिल्यानगरमध्ये 17 वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन; साहित्यिक मेजवानीची तयारी पूर्ण

या कारवाईमुळे महामार्गावरील डिझेल चोरीच्या घटनांमागील टोळी उघडकीस आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नगर-मनमाड महामार्गावर रात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक व अन्य वाहनांमधून डिझेल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशानुसार विशेष पथक गस्त घालत होते.

Highway Diesel Theft Gang
Ahilyanagar Jewellery Theft Case: अहिल्यानगर सावेडीतील सराफ दुकानात 2 लाखांचे सोन्याचे गंठण चोरी

पोलिस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल तनपुरे, रमीजराजा आत्तार, प्रकाश मांडगे, उत्तरेश्वर मोराळे आदींचे पथक 18 मे रोजी रात्री गस्त घालत असताना गुप्त माहिती मिळाली की, राहुरी-कोल्हार मार्गावर पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार संशयास्पदरीत्या फिरत असून त्यातील इसम डिझेल चोरीसह दरोड्याच्या तयारीत आहेत. पथकाने तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली.

Highway Diesel Theft Gang
Maharashtra Teachers Census Duty: 42 अंश तापमानात शिक्षकांकडून जनगणना; ‘जुलैनंतरच मोहीम घ्या’ची मागणी

गुहा परिसरात संबंधित कार दिसताच पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिला. मात्र, आरोपींनी पोलिसांना न जुमानता भरधाव वेगाने पलायन सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत आरोपींचा माग काढला. दरम्यान, आरोपींनी राहुरी फॅक्टरी शिवारातील बालाजी ढाबा परिसरात कार थांबवून काटवणात पळण्याचा प्रयत्न केला.

Highway Diesel Theft Gang
Sand Mining Protest: रामपूर कोकरे येथे वाळू उत्खननावरून संघर्ष; महिलांवर दगडफेक

मात्र, पोलिस पथकाने धाडसी पाठलाग करून चौघांना पकडण्यात यश मिळविले. या कारवाईत पोलिसांनी चारचाकीसह सुमारे दोन लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी करण राजू उर्फ राजेंद्र साळुंखे, सनी उर्फ सल्ल्या राजेंद्र पवार, जितेंद्र रोहिदास वाघमारे, प्रणव दिलीप चौधरी यांना अटक करण्यात आली असून निलेश मोकळ हा आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाला. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news