Nagar Illegal Gutkha Raid: नगर जिल्ह्यात अवैध गुटख्यावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; सहा ठिकाणी छापे, १.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

नेवासा, सुपा, पारनेरमध्ये एकाच दिवशी कारवाई; १६ जणांवर गुन्हे, स्थानिक गुन्हे शाखेची धडक मोहीम
Nagar Illegal Gutkha Raid
Nagar Illegal Gutkha RaidPudhari
Published on
Updated on

नगर: जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने अवैध गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर मोठी धडक कारवाई केली. १५ ऑगस्ट रोजी नेवासा, सुपा आणि पारनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी ६ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून १ लाख ३७ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर, १६ जणांवर गुन्हे दाखल केले.

Nagar Illegal Gutkha Raid
Dheeraj Pardeshi Murder Case: धीरज परदेशी खून प्रकरणात आणखी तिघांना अटक; आरोपींची संख्या १३ वर, सूत्रधाराचा शोध सुरू

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप दरवडे, अनंत सालगुडे आणि सहकाऱ्यांच्या चार विशेष पथकांनी ही कारवाई पार पाडली. गळनिंब येथे कारवाई करीत अल्ताफ सुभानभाई शेख (वय ३९) याच्याकडून ११,२०० रुपयांचा माल जप्त केला. पाचेगाव येथे कानिफनाथ कर्नासाहेब तुवर (वय २६) याच्याकडून १६,००० रुपयांचा माल जप्त करून गुन्हा दाखल केला.

Nagar Illegal Gutkha Raid
Shirdi Hawking Zone: शिर्डीतील पथविक्रेत्यांना आता कायमस्वरूपी जागा; ७५० अर्जांची यादी प्रसिद्ध, पोलिस पडताळणी बंधनकारक

पाचेगाव येथेच एका १६ वर्षीय विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले असून, त्याचा साथीदार अस्लम गणीभाई तांबाळी (फरार) याच्यासह ६४,००० रुपयांचा माल हस्तगत केला. सुपा पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापे घालून शहाजी छबन काळे (वय ४६, रा. म्हसणे), योगेश दत्तात्रय पवार (वय २१, रा. सुपा), बबन बांडे (रा. टाकळी ढोकेश्वर) यांच्यावर कारवाई करीत २३,०७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Nagar Illegal Gutkha Raid
Dhangarwadi Akhand Harinam Saptah: धनगरवाडीत आजपासून १७९वा अखंड हरिनाम सप्ताह; लाखो भाविकांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी

जवळा आणि निघोज परिसरात छापे घालून रोहिदास जगन्नाथ कोयते (वय ३६) व फिरोज चाँद इनामदार (वय ४८) यांना ताब्यात घेतले. याप्रकरणात आबिदा इनामदार, मनोहर बडे व मुन्नाभाई हे तिघे फरार असून ८,७३८ रुपयांचा माल जप्त झाला.

Nagar Illegal Gutkha Raid
Pathardi Dumper Threat Case: डंपरवरील कारवाईचा राग; मोटार वाहन निरीक्षकाच्या पतीला अडीच लाखांसाठी धमकी, सोन्याचे लॉकेट लुटले

निघोज परिसरात अविनाश बाळासाहेब लंघे (वय ३२), विशाल तुकाराम गाडीलकर (वय २७), रोहित पंढरीनाथ कोल्हे (वय ३०) यांना ताब्यात घेण्यात आले, तर सत्यम वरखेडे (फरार) याच्यासह १४, ५७२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. वरील सर्व आरोपींवर संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news