

अहिल्यानगर : नगर महापालिकेच्या प्रारुप प्रभागरचनेवर दाखल झालेल्या हरकतींवर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शुक्रवारी सुनावणी घेतली. सुनावणीसाठी 36 हरकतींदार उपस्थित होते. सुनावणी झालेल्या हरकतींवर जिल्हाधिकारी अभिप्राय व्यक्त करणार आहेत. त्यानंतर प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली जाणार आहे.(Latest Ahilyanagar News)
राज्य शासनाच्या आदेशानुसार आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा तयार करून महानगरपालिकेने हा आराखडा राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार 3 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केला. या प्रारुप प्रभागरचनेवर खासदार नीलेश लंके, दिलीप सातपुते, किरण काळे, नीलेश म्हसे, अॅड. अभिजीत पुप्पाल, महावीर पोखरणा, दिगंबर गेंट्याल, दिलीप सातपुते, किरण काळे, तायगा शिंदे, महावीर पोखरणा, अॅड. अभिजीत पुप्पाल, दिगंबर गेंट्याल, आदींसह 40 व्यक्तींनी 15 सप्टेंबरपर्यंत हरकती दाखल केल्या आहेत.
या हरकतींवर शुक्रवारी (दि.19) जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली. खासदार लंके यांनी दाखल केलेल्या हरकतीवर त्यांच्या वकिलांनी बाजू मांडली.
राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर 9 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत महापालिका आयुक्त यशवंत डांगे प्रसिध्द करणार आहेत.