Pathardi Politics: पाथर्डीत अजित पवार गटाची ताकद वाढली; मनसेचे प्रमुख पदाधिकारी राष्ट्रवादीत दाखल

'पक्षात जुने-नवे भेद न ठेवता योग्य सन्मान व जबाबदारी दिली जाईल'
Ajit Pawar
पाथर्डीत अजित पवार गटाची ताकद वाढली; मनसेचे प्रमुख पदाधिकारी राष्ट्रवादीत दाखलFile photo
Published on
Updated on

पाथर्डी: मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष किरण पालवे, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव विलास देशमुख, विधी व जनहित कक्षाचे प्रवीण वाघमारे, तालुका उपाध्यक्ष शरद मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे, आमदार संग्राम जगताप, शिवाजीराव गर्जे, काशिनाथ दाते, चंद्रशेखर घुले यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. (Latest Ahilyanagar News)

Ajit Pawar
Rain Effect: वादळी पावसाने नेवाशात दाणादाण; झाड पडून एकाचा मृत्यू

मनसेतील अंतर्गत गटबाजी, पक्षाची दिशाहीन भूमिका आणि लोकांमध्ये दुरावलेला विश्वास, यामुळे पक्ष सोडल्याचे पालवे यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी विविध प्रश्नांवर लढा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाची विकासाभिमुख भूमिका, कार्यशैली व सर्वसामान्यांशी जोडलेला संवाद पाहून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

Ajit Pawar
Ahilyanagar: नुकसानीचे पंचनामे करून मदत द्या: मोनिका राजळे

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पक्षात जुने-नवे भेद न ठेवता योग्य सन्मान व जबाबदारी दिली जाईल. नेतृत्व क्षमता आणि सर्व घटकांना सोबत घेऊन चालण्याची ताकद असणार्‍यांना संघटनेत महत्त्वाची भूमिका दिली जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news