

पाथर्डी: पाथर्डी तालुक्यातील नुकसानीची पाहणी करून, आमदार मोनिका राजळे यांनी गुरुवारी शेतकरी-नागरिकांना दिलासा दिला. निंवडुगे, मढी, धामणगाव, शिरसाटवाडी, रांजणी, केळवंडी, चेकेवाडी, धनगरवाडी, रुपलाचा तांडा, आल्हणवाडी, घुमटवाडी, माणिकदौंडी, वंजारवाडी, कोकीस्पीर तांडा, डमाळवाडी, पिरेवाडी, आठरवाडी, जाटदेवळे (शिंदेवाडी-नाकाडेवाडी), बोरसेवाडी, चितळवाडी-कोठेवाडी, पत्र्यांचा तांडा, लांडकवाडी-भापकरवाडी अशा अनेक गावांना त्यांनी भेट दिली. शुक्रवारी त्या शेवगाव तालुक्यातील दौऱ्यावर जाणार असून शनिवारी पुन्हा पाथर्डी तालुक्यात पाहणी करणार आहेत.
या पाहणीदरम्यान धनंजय बडे, दिगंबर भवार, विष्णुपंत अकोलकर, बजरंग घोडके, संदीप पठाडे, नारायण पालवे, काकासाहेब शिंदे, रवींद्र वायकर, भगवान मरकड, राधाकिसन मरकड, शुभम गाडे, सचिन वायकर, राधाकिसन कर्डिले, जमीर आतार, समीर पठाण, अशोक गाडे, आर. के. चव्हाण, किशोर चव्हाण, रामकिसन काकडे, पांडुरंग मरकड, बाळासाहेब शिरसाट, शिवनाथ मोरे, मारुती चितळे, महादेव रहाटे आदी मान्यवर उपस्थित होते. (Latest Ahilyanagar News)
आ. राजळे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. या भागासाठी अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन आ. राजळे यांनी दिले.
राजू साळुंके यांचा मृतदेह सापडला
पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या राजू साळुंके यांचा मृतदेह अखेर तीन दिवसांनंतर शुक्रवारी माणिकदौंडी तलावात सापडला. माजी सैनिक व मुंबई पोलिस दलातील अधिकारी रियाज मेजर पठाण यांनी तो बाहेर काढला.