Jamkhed Crime News: स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने तरुणास भरदिवसा 11 लाखांना लुटले

भरदिवसा ही घटना घडल्याने जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे
Crime in jamkhed
तरुणास भरदिवसा 11 लाखांना लुटलेPudhari Photo
Published on
Updated on

जामखेड : स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने आठ ते दहा जणांच्या टोळक्याने तरुणास मारहाण करून अकरा लाख रुपयांना लुटले आहे. ही घटना जामखेड तालुक्यातील कुसडगाव रस्त्यावर भरदिवसा घडली आहे. या प्रकरणी आठ ते दहा जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा ही घटना घडल्याने जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

फिर्यादी राजेंद्र दिलीप मैड (वय 35 वर्षे रा आश्वी खुर्द ता. संगमनेर जिल्हा अहिल्यानगर) यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अश्विनी (पुर्ण नाव माहीत नाही), अतुल (पुर्ण नाव माहीत नाही) व सोबतचे 8 ते 9 अनोळखी इसम अशा एकूण आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी राजेंद्र मैड यांना आठ ते दहा जणांनी आमच्याकडे स्वस्तात सोने आहे ते आम्ही तुम्हाला स्वस्तात देतो असे सांगून काल बुधवार दि 14 मे 2025 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जामखेड तालुक्यातील कुसडगाव रस्त्यावरील पुलाच्या जवळ बोलवले. फिर्यादी हे त्या ठिकाणी त्यांचे काही सहकारी घेऊन त्या ठिकाणी पोहचले. ते सोबत स्वस्तात मिळत असलेले सोने घेण्यासाठी दहा लाख रुपये घेऊन आले होते. यानंतर यातील आठ ते दहा जणांनी फिर्यादीस यांना मारहाण करून त्यांच्या जवळील पिशवीत आसलेले रोख दहा लाख रुपये तसेच गळ्यातील सोन्याची चैन, हातातील चांदीचे कडे, मनगटी घड्याळ व मोबाईल असा एकूण 11 लाख 5 हजार रुपयांचा ऐवज लंपास करुन घटना स्थळावरून पळून गेले.

Crime in jamkhed
Shirdi Saibaba Temple: देणगीदारांवर सुविधांची बरसात, 50 लाखांपेक्षा अधिक दान देणाऱ्यांना काय मिळणार?

यानंतर फिर्यादी यांना आपली फसवणूक व लुटमार झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने जामखेड पोलीस स्टेशनला धाव घेतली. घटनास्थळी स्थळी उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली. राजेंद्र मैड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. सध्या पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. पुढील तपास सपोनि नंदकुमार सोनवलकर हे करीत आहेत.

Crime in jamkhed
Shrirampur News: अविश्वास ठराव दाखल झाला...सभाही सुरु झाली...पण 15 मिनिटांत आदेश प्राप्त अन् अविश्वासाची सभा तहकूब

जामखेड ते कुसडगाव रस्त्यावरील पुलाजवळ व तळ्याच्या खालच्या बाजूला नेहमीच रोडरोबरी व लूटमारीच्या घटना घडत आहेत. आडमार्ग असल्याने आरोपी हे या रस्त्याचा फायदा घेत या ठिकाणी लूटमार करीत असतात. त्यातच भरदिवसा ही घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अशा घटना घडू नयेत म्हणून कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news