Gutkha Smuggling Case: युसुफ चौगुलेवर मकोका लावण्याची मागणी; कऱ्हे घाटातील अपघातानंतर गुटखा तस्करीचे रॅकेट उघड

सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर पुन्हा गुन्हेगारीचा आरोप; विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाचे पोलिस अधीक्षकांकडे निवेदन
Gutkha Smuggling
Gutkha SmugglingPudhari
Published on
Updated on

घारगाव: सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळताच युसुफ चौगुले याने महिनाभरात पुन्हा कायद्याची पायमल्ली केल्याचे कऱ्हे घाटातील एका अपघाताने समोर आले आहे. त्यामुळे त्याला तात्काळ पकडून मकोकाची कारवाई करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने जिल्हा पोलिस अधीक्षक व संगमनेरचे पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्याला मध्यप्रदेशातून बेकायदेशीर गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसांची तस्करी करताना पकडले होते. हे कट्टे त्याने पठारभागातील आणि जिल्ह्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना संपवण्यासाठी आणल्याचा आरोप केला जात आहे.

Gutkha Smuggling
Karjat Nagar Panchayat No Confidence Motion: कर्जत नगरपंचायतीत पुन्हा राजकीय भूकंप; उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव

दोन वर्षांपूर्वी पठारभागातील लव्ह जिहाद प्रकरणातील युसुफ दादा चौगुले हा पुन्हा एकदा गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसांच्या रडारवर आला आहे. गुरुवारी (दि. ९) सकाळी संगमनेर तालुक्यातील कऱ्हे घाटात झालेल्या एका भीषण कार अपघाताने त्याच्या गुटखा तस्करीच्या आंतरराज्य रॅकेट उघड झाले आहे. संगमनेर पोलिसांनी घटनास्थळावरून ८ लाख ४० हजार १३६ रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल व ५ लाखांची इनोव्हा कार, असा १३ लाख ४० हजार १३६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून तिघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Gutkha Smuggling
Ahilyanagar Milk Collection: भेसळविरोधी कारवाईचा मोठा परिणाम? अहिल्यानगरमध्ये दररोज दोन लाख लिटर दूध संकलन घटले

नाशिककडून भरधाव वेगाने येणाऱ्या एका इनोव्हा कारचा (क्र. एम. एच. ०१ बी. बी. ९१४९) चालकावरील ताबा सुटला. वेग इतका अनियंत्रित होता की कार थेट सुरक्षा कठडे तोडून नव्या आणि जुन्या घाटाच्या दरम्यान असलेल्या खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला. ​अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि इतर वाहनचालकांनी तातडीने दरीत उतरून जखमींना बाहेर काढले. या घटनेत चौगुलेचे दोन पंटर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Gutkha Smuggling
Ahilyanagar Nepti Market Closed: संत निवृत्तीनाथ महाराज पालखीसाठी नेप्ती उपबाजार दोन दिवस बंद; ५० हजार वारकऱ्यांच्या सेवेसाठी बाजार समितीचा निर्णय

संगमनेर तालुका पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा कारमधील सीट काढून त्याठिकाणी प्लास्टिकच्या गोण्या खच्चून भरल्या होत्या. तपासणीत साधारण ३० ते ३५ गोण्यांमध्ये बेकायदेशीर प्रतिबंधित गुटखा असल्याचे उघड झाले. पो. हे. कॉ. बाबासाहेब शिरसाठ यांच्या फिर्यादीनुसार आरोपी सिंकदंर रफिक शेख, अरमान निजाम शेख दोन्ही (रा. जांबूत साकुर), युसुफ दादाभाई चौगुले (रा. घारगाव, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gutkha Smuggling
Pimpalner Nilobaray Maharaj Palkhi: श्रीक्षेत्र पिंपळनेरहून निळोबाराय महाराजांच्या पालखीचे भक्तिमय प्रस्थान; रस्ते काँक्रीटचे करण्याची मंत्री इंद्रनील नाईक यांची ग्वाही

​गुजरातचा गुटखा संगमनेर मार्गे पश्चिम महाराष्ट्रात

​गुजरातवरून खच्चून भरलेला गुटखा संगमनेर मार्गे पश्चिम महाराष्ट्रात जात होता. महाराष्ट्रात गुटखा बंदी असल्यामुळे गुटख्याला मागणी आहे. मात्र, शेकडो किलोमीटरच्या प्रवासात या वाहनाला कुठेही अडवण्यात आली नाही. त्यामुळे सीमा तपासणी नाके व पोलिसांच्या नाकाबंदीवर प्रश्न उपस्थित होत आहे.

गुटखा तस्करीतून गुन्हेगारी समोर

गुटखा तस्करी करणाऱ्या आरोपींवर मकोका कारवाई करावी, असे निर्देश अन्न व औषध आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. चौगुलेची गुन्हेगारी पार्श्वभूमी गुटखा तस्करीतून समोर आली आहे. त्यामुळे मकोका कारवाईची मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news