

खरवंडी कासार: पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी येथील प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक बनली असून ती कधीही कोसळू शकते. ग्रामस्थांनी गेल्या तीन वर्षांत तीनवेळा प्रस्ताव पाथर्डी पंचायत समिती शिक्षण विभागाकडे पाठविले. त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. (Latest Ahilyanagar News)
नगर जिल्ह्यातील निबोंडी येथे काही वर्षापूर्वी शाळा इमारतीची दुघर्टना झाली. तेव्हा प्राथमिक शाळा इमारतीचे जिल्हाभरातील शाळा इमारतीचे निर्लेखन झाले.े अधिकार्यानीही इमारती बसण्या योग्य नाही, असा शेरा मारला. परंतू बर्याच निर्लेखन झालेल्या शाळा इमारतीत मुलाना शिक्षण घ्यावे लागते.
पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी शाळेतील पहिली ते चौथी या वर्गातील 70 विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत आहेत. या शाळेची इमारत 1972 सालची असून, या शाळेचे बांधकाम दगड-मातीमध्ये झालेल्या असून बर्याच ठिकाणी चिरा गेल्या आहेत.
पत्र्यांना छिद्र पडले असून, या महिन्यातील अतिशय मुसळधार झालेल्या पावसाचे पाणी शिरूरही इमारत अतिशय धोकादायक बनले आहे. याचे कारण म्हणजे त्या वर्गामध्ये फक्त पाणीच पाणी आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी कुठेही कोरडी जागा राहत नाही. धोकादायक बनलेल्या इमारतीची जबाबदारी कोणी घ्यायची. त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना वर्ग खोल्यांमध्ये न बसवता पडवीमध्ये बसवून मुलांना शिकवत आहेत.
या इमारतीची जबाबदारी कोणताही शिक्षक घ्यायला तयार नाही. त्यामुळे प्रशासनाने ताबडतोब याकडे लक्ष घालून या लहान चिमुकल्यांच्या शाळेच्या इमारतीची सोय करावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.