Pathardi cooperative society: नियमाप्रमाणे व्यावसायिक गाळ्यांचे वाटप होणार: आ. राजळे

शेतकी माल खरेदी-विक्री सहकारी सोसायटी वार्षिक सर्वसाधारण सभा
Pathardi cooperative society
शेतकी माल खरेदी-विक्री सहकारी सोसायटी वार्षिक सर्वसाधारण सभाPudhari
Published on
Updated on

पाथर्डी : संघाच्या मालकीच्या भव्य इमारतीचे लोकार्पण लवकरच होणार असून, शासनाच्या नियम व निकषांनुसार गाळ्यांचे लिलाव करून त्यांचे पारदर्शक वाटप करण्यात येईल. कोणतीही अनियमितता न होता प्रामाणिक पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडली जाईल, असे आ. मोनिका राजळे यांनी सांगितले.  (Latest Ahilyanagar News)

आप्पासाहेब राजळे मंगल कार्यालयात शनिवारी (दि. 20) झालेल्या तालुका शेतकी माल खरेदी-विक्री सहकारी सोसायटीच्या 99व्या वार्षिक सर्वसाधारण त्या बोलत होत्या. या वेळी धनंजय बडे, अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, नारायण धस, अशोक चोरमले, हिंदकुमार औटी, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन बंडू पठाडे, व्हाईस चेअरमन भगवान आव्हाड, बाळासाहेब अकोलकर, सुभाष बर्डे, कुंडलिक आव्हाड, विष्णुपंत अकोलकर, काकासाहेब शिंदे, सुनील ओव्हळ, रामकिसन काकडे, नारायण पालवे, विष्णुपंत पवार, रवींद्र वायकर, रवींद्र आरोळे, मुकुंद गर्जे, सचिन वायकर, शुभम गाडे, उमेश खेडकर, ज्योती शर्मा आदी उपस्थित होते.

Pathardi cooperative society
Central Bank misconduct: शाखाधिकार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे; सेंट्रल बँकेच्या गलथान कारभारा विरोधात आंदोलनाचा इशारा

राजळे म्हणाल्या की, स्व. राजीव राजळे यांनी विधानसभेतील पराभवानंतर खरेदी-विक्री संघाच्या संचालक मंडळात सहभागी होताच काहींनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र, स्व. राजळे यांच्याकडे स्पष्ट व्हिजन होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे तोट्यातील संस्था ऊर्जितावस्थेत आली. गाळेवाटपानंतर त्यातून मिळणार्‍या उत्पन्नामुळे संस्था तोट्यातून बाहेर पडेल.

Pathardi cooperative society
Leopard rescue Rahuri: वन कर्मचारी, कनगरकरांच्या अथक परिश्रम यशस्वी; बिबट्या विहिरीतून पुन्हा पिंजर्‍यात!

भविष्यात संस्थेचे मंगल कार्यालय, पेट्रोल पंप, व्यावसायिक गाळे यांसारख्या उत्पन्नवर्धक प्रकल्पांसोबतच अजूनही काही विशेष प्रकल्प हाती घेण्यासाठी संचालक मंडळाने पुढाकार घ्यावा. आज खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती व तालुका दूध संघ या सहकार संस्थांवर शेतकर्‍यांचा विश्वास टिकून आहे आणि संस्था नावारूपाला पोहोचत आहेत. चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाचे योगदान संस्थांच्या उभारणीत महत्त्वाचे ठरल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Pathardi cooperative society
Dengue free campaign: सुदृढ आरोग्यासाठी मनपाकडून उपाययोजना; मोहिनीनगर भागात डेंग्यूमुक्त अभियान

संचालक भीमराव पालवे, कैलास देवढे, सुधाकर भवार, गंगाधर गर्जे, आण्णा वांढेकर, विठ्ठल मरकड, राम पठाडे, मच्छिंद्र सावंत, बाबासाहेब चितळे, संतोष भागवत, सिंधुताई साठे, सुनीता काटे, पोपट कराळे, पुरुषोत्तम इजारे, सचिव निलेश भुकन आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बंडू पठाडे, सूत्रसंचालन राजीव सुरवसे यांनी करून आभार पोपट कराळे यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news